सॅमसंग गॅलेक्सी एस 10 नवा स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, उत्कृष्ट कॅमेरा फिचरसह ही असतील या स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये
Samsung (Photo Credit: Fortune)

मोबाईल निर्माता कंपनी नेहमीच आपल्या स्मार्टफोन्सच्या माध्यमातून ग्राहकांना उत्कृष्ट सुविधा प्रदान करत असते. बदलत्या काळानुसार आपल्या स्मार्टफोन्समध्ये ग्राहकांना आवडतील असे बदल करुन सॅमसंग गॅलेक्सी एस 10 आपला नवा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. Samsung Galaxy S10 Lite असे या स्मार्टफोनचे नाव असून या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात 48MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, जबरदस्त फीचर्स असलेले हे मॉडेल इतर फोनच्या तुलनेत स्वस्त असेल असे सांगण्यात येत आहे.

जीएसएण एरीनाच्या रिपोर्टनुसार गॅलेक्सी एस 10 लाइटमध्ये गॅलेक्सी A91 प्रमाणे 45 वॅट फास्ट चार्जिंगची टेक्नॉलॉजी देण्यात येईल. याशिवाय फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर फुल एचडी प्लस रिझोल्युशनसह 6.7 इंचाचा डिस्प्ले यात देण्यात आला आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळू शकते. हेदेखील वाचा- सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Samsung Galaxy Fold लॉंच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, S10 lite मध्ये 48 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर कॅमेरा असू शकतो. गॅलेक्सी S10E सारखाच किंवा त्यापेक्षा एस10 lite चांगला असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनचा फ्रंट फेसिंग कॅमेरा 32 मेगापिक्सेलचा असेल.

या स्मार्टफोनमध्ये 45 वॅटच्या फास्ट चार्जिंगसह 4,500mAh पॉवरची बॅटरी असेल. या मॉडेलबद्दल सॅमसंगकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच याची किंमत 61 हजार रुपयांपर्यंत असू शकेल असं म्हटलं जात आहे.