दमदार फिचर्स आणि उत्कृष्ट बॅटरी लाईफ असलेला Samsung Galaxy A01 स्मार्टफोन लाँच; पाहा या बजेट स्मार्टफोनची अन्य वैशिष्ट्ये
Samsung Representative Image (Photo Credit: File Photo)

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A01 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन व्हिएतनाम शहरात लाँच झाला असून भारतातही लवकरच लाँच करण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या फोनमध्ये लेटेस्ट प्रोसेसर आणि दमदार कॅमेऱ्याचा सपोर्ट मिळणार आहे. या आधी कंपनीने A51 ला भारतासह अन्य देशात लाँच केले होते. या स्मार्टफोनची किंमत 8,550 रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. काळा, निळा आणि लाल रंगात या स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

Samsung Galaxy A01 हा 6 फेब्रुवारी पासून हा फोन खरेदी करता येऊ शकणार आहे. हा फोन शाओमी, ओप्पो आणि विवोच्या फोनला टक्कर देईल. या फोनमध्ये 5.7 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 एसओसी सह 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे.

हेदेखील वाचा- 2024 पर्यंत रोबोट करतील मॅनेजर्सची 69 टक्के कामे; लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात

या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर यात 13 MP आणि 2MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. तर 5MP फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनमध्ये ब्लूटूथ, वायफाय, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच 3000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. Samsung Galaxy A01 स्मार्टफोनच्या किंमतीच्या तुलनेत यात खूप जबरदस्त फिचर्स देण्यात आले आहे. तसेच हा बजेट स्मार्टफोन असण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय ग्राहकांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे.

भारतात नोकिया नंतर सर्वात जुनी आणि लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी म्हणजे सॅमसंग. सॅमसंगच्या जबरदस्त वैशिष्ट्यांमुळे आजही अनेक लोक सॅमसंग स्मार्टफोनला आपली पहिली पसंती दर्शवतात.