आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तत्पर असलेली कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) लवकरच एक नवा फोन बाजारात सादर करणार आहे. जिओच्या या फोनमध्ये मीडिया टेक चिपसेट (MediaTek Chipset) असेल. रिलायन्स रिटेलच्या 4G फोनची घटती मागणी लक्षात घेत कंपनीने नवा फोन लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 4G फिचर फोनवर काम सुरु आहे. लवकरच हा फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसंच आम्ही KaiOS या ऑपरेटिंग सिस्टमवर देखील काम करत असल्याची माहिती मीडिया टेकच्या वायरलेस कम्युनिकेशनच्या युनिटचे व्यवस्थापकीय संचालक टीएलली यांनी दिली. (Jio ने लॉन्च केले JioRail App, रेल्वे तिकीट मिळणार एका क्लिकवर, जाणून घ्या)
मीडिया टेक (MediaTek) पहिल्या Lyf ब्रँडच्या अंतर्गत अॅनरॉईड गो ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणारे फोन बाजारात आणले होते. भारतात सध्या जिओ फोनसाठी कॉलकॉम आणि Unisoc कंपन्या चिपसेट उपलब्ध करून देतात. तसंच एप्रिल ते जून 2019 या तिमाहीत फिचर फोनच्या भागीदारीत 28 टक्क्यांनी घट झाली असून गेल्या वर्षी हे प्रमाण 47 टक्के इतके होते. जिओ फोनच्या मागणीत होणारी घट यामुळे भारताच्या फिचर फोन मार्केटमध्ये ही घट 39 टक्क्यांवरहून खाली आली आहे. (लवकरच लॉन्च होईल Reliance Jio चा नवा JioPhone 3; पहा काय असतील फिचर्स आणि किंमत)
जिओ फोनच्या मागणीत सातत्याने होत असलेली घट लक्षात घेत कंपनीने नवा दमदार फोन बाजारात लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.