लवकरच लॉन्च होईल Reliance Jio चा नवा JioPhone 3; पहा काय असतील फिचर्स आणि किंमत
Reliance Jio (Photo Credit: File Photo)

भारत ही जगातील दुसरी सर्वात मोठी मोबाईल फोनची बाजारपेठ आहे. यामुळे अॅपलपासून ते सॅमसंगपर्यंत सर्व बड्या मोबाईल कंपन्या भारतात व्यापर करत असतात. भारतात मिळणारा जबरदस्त फायदा लक्षात घेऊन या कंपन्या भारतातील आपला व्यापार वाढवत आहेत. मात्र भारतीय मोबाईल कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) या सर्व विदेशी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या ऑफर्स सादर करत असते. आता रिलायन्स जिओ JioPhone सिरीजमधील पुढील स्मार्टफोन JioPhone 3 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

JioPhone पहिल्यांदा 2017 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या वर्षी JioPhone 2 लॉन्च करण्यात आला. आता JioPhone 3 हा कंपनीचा तिसरा फोन असेल. (Google ला Jio Browser App टक्कर देणार, स्मार्टफोन युजर्ससाठी जिओकडून नवं गिफ्ट)

JioPhone 3 मध्ये 5 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच 2 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह मायक्रो एसडी कार्डही यात सपोर्ट करेल. याशिवाय यात QWERTY बोर्डही देण्यात येईल. त्यामुळे याचा फिचर फोन प्रमाणेही वापर करण्यात येईल. मात्र या फोनच्या ऑपरेटिंग सिस्टमबद्दल विशेष काही माहिती मिळालेली नाही. या फोनची किंमत 4500 रुपये असू शकते.