Google ला Jio Browser App टक्कर देणार, स्मार्टफोन युजर्ससाठी जिओकडून नवं गिफ्ट
Android Smartphone (Photo Credit- flickr William Hook)

रिलाईन्स (Reliance ) कंपनीने पुन्हा एकदा त्यांच्या जिओ (Jio) युजर्ससाठी एक नवं अॅप लॉन्च केले आहे. तर गुगल (Google) ला हे जिओचे अॅप टक्कर देणार का याचा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.

जिओने स्मार्टफोन युजर्ससाठी Jio Browser App हे अॅप नुकतेच लॉन्च केले आहे. तसेच जिओचे हे नवे अॅप गुगल ब्राऊजर पेक्षा थोडे वेगळे असण्याची शक्यता आहे. फक्त ऑन्ड्रॉईड युजर्ससाठी सध्या हे अॅप सुरु करण्यात आले आहे. या अॅपमधील खास गोष्ट म्हणजे युजर्सकडे जिओ कनेक्शन असणे आवश्यक नसणार आहे. त्यामुळे हे अॅप कोणत्याही स्मार्टफोनमध्ये उपलब्ध होणार आहे.(हेही वाचा-Jio ने लॉन्च केले JioRail App, रेल्वे तिकीट मिळणार एका क्लिकवर, जाणून घ्या)

रिलाईन्स जिओनुसार हे अॅप भारतातील असे एक ब्राऊजर आहे जो भारतीयांच्या नजरेतून बनवण्यात आला आहे. यामध्ये हिंदी, गुजराती, मराठी, तमिळ, तेलगु, मल्ल्याळम, कन्नड आणि बंगाली अशा विविध भाषेचा उपयोग या अॅपच्या माध्यमातून करता येणार आहे. तसेच युजर्स स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन भाषा बदलू शकतात.

Jio Browser App हे फक्त 4.8 MB चे असणार आहे. तसेच अॅप डाऊनलोड केल्यावर युजर्सला राजकीय, मनोरंजन, क्रिडा आणि टेक्नॉलॉजी क्षेत्राशी संबंधित बातम्या उपलब्ध होणार आहे. तसेच एक व्हिडिओ बातम्यांसाठी ऑप्शन देण्यात आले आहे. त्याचसोबत प्रायव्हेट ब्राऊजिंगची सुविधा या अॅपमध्ये लागू करण्यात आली आहे.