Reliance JioMeet (Photo Credits: JioMeet Play Store)

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व्हिडिओ कॉलिंगला अधिक महत्त्व प्राप्त झाले. ऑफिस मिटिंग्स, ऑनलाईन सेशन्स, फॅमेलि चॅट यासाठी व्हिडिओ कॉलिंगचा वापर अधिक वाढला. हीच बाब लक्षात घेत रियालन्स जिओने (Reliance Jio) जिओमीट (JioMeet) हे एचडी व्हिडीओ कॉन्फरसिंग अॅप (HD Video Conferencing App) लॉन्च केले आहे. त्यामुळे आता JioMeet हे अॅप गुगल प्ले स्टोर, अॅप स्टोर वर डाऊनलोडिंगसाठी उपलब्ध आहे. तसंच डेक्सटॉप युजर्स (Desktop Users) देखील याचा लाभ घेऊ शकतात. काही युजर्सच्या मोबाईलवर या अॅपचे टेस्टिंग करण्यात आले. त्यानंतर अॅपचे स्टेबल व्हर्जन रिलीज करण्यात आले. त्यामुळे रियालन्स जिओचे हे नवे अॅप गुगल मीट (Google Meet), गुगल डुओ (Google Duo) आणि झुम (Zoom) या व्हिडिओ कॉन्फरसिंग अॅपला टक्कर देण्यास सज्ज झाले आहे.

एचडी व्हिडिओ कॉलिंग अॅप JioMeet मध्ये एका वेळेस 100 लोक सहभागी होऊ शकतात. तसंच व्हिडिओ कॉल सुरु करण्यासाठी इन्व्हाईट्स आणि कोट्सची गरज भासत नाही. प्रतिस्पर्धी झुम देखील गुगल क्रोम आणि मोझिला फायरफॉक्स द्वारे आयओएस आणि अॅनरॉईड मोबाईल फोन्सवरुन फ्री मध्ये JioMeet अॅप अक्सेस करु शकतात. प्रत्येक व्हिडिओ मिटींगला सुरक्षेसाठी पासवर्ड देण्यात येईल. तसंच यात होस्ट वेटिंग रुम ऑन करु शकतो. ज्यामुळे कोणतीही व्यक्ती परवानगीशिवाय मिटिंग जॉईन करणार नाही याची खात्री देता येते.

JioMeet अॅप मोबाईल किंवा डेक्सटॉपवर कसा डाऊनलोड कराल?

# प्ले स्टोअर वरुन जा. तिथे JioMeetअॅप सर्च करा.

# तेथून अॅप Install बटणावर क्लिक करा.

# डेक्सटॉप व्हर्जन डाऊनलोड करण्यासाठी जिओमीट वेबसाईटवर जा आणि तेथून अॅप डाऊनलोड करा. त्यासाठी 'Download for Windows'या ऑप्शनवर क्लिक करा.

JioMeet हे अॅप अॅनरॉईड 5.0 पेक्षा अधिक व्हर्जन असणाऱ्या सर्व मोबाईलमध्ये चालेल. त्यासाठी मोबाईलमध्ये कमीतकमी 2GB रॅमची आवश्यकत आहे. आयफोन युजर्ससाठी iOS व्हर्जन 9 पेक्षा अधिक आणि macOS 10.13 पेक्षा अधिक असणाऱ्या डिव्हाईसेस मध्ये हा अॅप चालेल. व्हिडोज 10 युजर्ससाठी Microsoft .NET Framework 4.5.2 पेक्षा जास्त आणि कमीत कमी 4GB रॅम असणाऱ्या डिव्हाईसेसवर हा अॅप रन होऊ शकतो.

JioMeet अॅपद्वारे एका दिवसाला तुम्ही अनलिमिडेट मिटिंग्स घेऊ शकता किंवा सहभागी होऊ शकता. त्याचप्रमाणे प्रत्येक मिटिंग 24 तासापर्यंत चालू शकते. JioMeet अॅपला प्ले स्टोरवर अजून पर्यंत 1 लाख डाऊनलोड्स मिळाले आहेत. त्यामुळे इतर व्हिडिओ कॉन्फरसिंग अॅपच्या तुलनेत या अॅपला किती लोकप्रियता मिळते हे औत्सुक्याचे ठरणार आहे.