Reliance Jio युजर्ससाठी खुशखबर! एक वेळ रिचार्ज करा, 3 मिहिने डेटा, कॉलींगसह इतर सेवा मोफत मिळवा
Reliance Jio | (File Photo)

टेलीकॉम क्षेत्रात Reliance Jio या कंपनीने प्रवेश केला आणि या क्षेत्राचे विश्वच पालटले. BSNL या सरकारी कंपनीसह एअरटेल (Airtel), आयडिया (Idea), वोडाफोन (Vodafone) यांसारख्या अनेक कंपन्यांना धक्का बसला. अनेक गोष्टी स्वस्त किंवा मोफत देऊन किंमत युद्धात Reliance Jio ने बाजी मारली. आता तर रिलायन्स जिओ ने पुन्हा एकदा किंमत युद्ध सुरु केले असून आणखी एक धमाकेदार प्लान लॉन्च केला आहे. Long Term Pack कॅटेगरीतील प्लान म्हणून हा पॅक ओळखला जाऊ लागला आहे. काय आहे हा प्लान घ्या जाणून.

रिलायन्स जिओ (Reliance Jio) चा हा 499 रुपयांचा प्लान आहे. या प्लाननुसार तुम्ही एकवेळ रिचार्ज केले असता तुम्हाला प्रति दिन 1.5 GB म्हणजेच 136.5 GB डेटा मिळणार आहे. या सोबतच या प्लानमध्ये प्रति दिन 100 SMS ही मिळणार आहेत. तर व्हाईस कॉलिंग आणि इनकमींग फ्री राहणार आहे. या प्लानची वैधता 91 दिवस (3 महिने) इतकी असणार आहे. (हेही वाचा, भारतात लाँच होण्याआधीच Google Pixel 3a XL स्मार्टफोनची किंमत झाली लीक)

दरम्यान, या आधीही Reliance Jio कडून एक बातमी आली होती की, जिओ लोवकरच एक सुपर अॅप लॉन्च करणार आहे. प्राप्त माहिती नुसार हे एक असे अॅप असेल ज्यात तुम्ही 100 पेक्षाही अधिक सुविधा मिळवू शकाल. या अॅपमुळे अॅमेझॉन (Amazon)आणि वॉलमार्ट-फ्लिपकार्ट (Flipcart) वर मोठा परिणाम पडू शकतो.