Google Pixel 3a XL Photo Credits: Twitter

जगातील नामांकित कंपनी म्हणून उल्लेख केली जाणारी गुगल(Google) आज Google I/O 2019 डेव्हलपर कॉन्फरन्सध्ये आपले दोन नवीन स्मार्टफोन Pixel 3a आणि Pixel 3a XL लाँच करणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स भारतात 8 मे ला लाँच होणार आहेत. आतापर्यंत ह्या स्मार्टफोनची बरीच माहिती लीक झाली आहे. त्यात भर म्हणून आता ह्या स्मार्टफोनची किंमतसुद्धा लीक झाली आहे. गुगल पिक्सल 3a XL (Google Pixel 3a XL) ची किंमत असेल 44,999 रुपये.

लीक झालेल्या रिपोर्टनुसार, Pixel 3a XL च्या 6GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 44,999 रुपये इतकी असेल. तथापि, मागील आठवड्यात लीक झालेल्या रिपोर्टनुसार, ह्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 27,800 रुपये इतकी सांगण्यात आली होती.

लीक झालेल्या माहितीनुसार, गुगल पिक्सल 3a XL मध्ये 5.6 इंचाचा OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ज्याचे रिझोल्युशन 2220x1080 पिक्सेल असेल. तर पिक्सल 3a XL मॉडल ची स्क्रीन 6 इंचाची असू शकते. फोनच्या समोरील बाजूससुद्धा सिंगल सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. ह्यात 3.5mm हेडफोन जॅकसुद्धा मिळू शकतो. पिक्सल 3a (Pixel 3a) मध्ये स्नॅपड्रॅगन 670 आणि पिक्सल 3a XL मध्ये स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट दिला जाऊ शकतो.

Xiaomi चा रेडमी नोट 6 प्रो भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, कंपनीच्या म्हणण्यानुसार, हयात 8MP चा फ्रंट कॅमेरा आणि 12MP चा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. हे दोन्ही स्मार्टफोन्स ऍन्ड्रॉइड 9.0 OS वर चालेल. तसेच ह्या स्मार्टफोनमध्ये कदाचित 3000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.