Xiaomi चा रेडमी नोट 6 प्रो भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
शाओमी रेडमी नोट 6 प्रो (Photo: IANS)

चीनची मोबाईल कंपनी शाओमीने (Xiaomi) रेडमी नोट 6 प्रो भारतीय बाजारात लॉन्च केला. यात 4 जीबी प्लस 64 जीबी वेरिएंटची किंमत 13,999 रुपये आणि 6 जीबी प्लस 64 जीबी वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन डॉट कॉम, फ्लिपकार्ट आणि मी होमवर 23 नोव्हेंबरला 'ब्लॅक फ्राईडे' सेलमध्ये डिस्काऊंटमध्ये उपलब्ध होईल. यात 4 जीबी प्लस 64 जीबी वेरिएंट 12,999 रुपये आणि 6 जीबी प्लस 64 जीबी वेरिएंट 14,999 रुपयांना मिळेल.

शाओमी इंडियाचे मुख्य अधिकारी अनुज शर्मा यांनी सांगितले की, "रेडमी नोट 6 प्रो, रेडमी नोट 5 प्रो चे हे अपग्रेड व्हर्जन आहे आणि आम्हाला आशा आहे की, चाहते शाओमीच्या या अभिनव उत्पादनांचा आनंद घेतील."

रेडमी नोट 6 प्रो मध्ये 6.26 इंचाचा एफएचडी प्लस आयपीएस डिस्प्ले सोबत 19.9 एसपेक्ट रेशियो तसेच कॉर्निग गोरिल्ला ग्लास देण्यात आले आहे. याचा फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सल प्लस 2 मेगापिक्सलचा एक ड्युअल कॅमेरा आहे. तर रिअर कॅमेरा 1.4 युएम पिक्सल्ससोबत 12 मेगापिक्सल प्लस 5 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा आहे. रेडमी नोट 6 प्रोमध्ये अॅनरॉईड 8 ओरिओ ऑपरेटिंग सिस्टमवर आधारीत कंपनीचा मीयूआय 10 स्क्रिन देण्यात आले आहे.

या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रेगन 636 ऑक्टा-कोर प्रोसेसरसोबत 4,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. यात 'क्विक चार्ज 3.0' सपोर्ट करतो. ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान हे दोन्ही वेरिएंट एचडीएफसी क्रेडिट आणि डेबिट कार्ड किंवा ईएमआयवरुन खरेदी केल्यास 500 रुपयांची सूट मिळत आहे.