Redmi Note 9 व्हेरिएंट आता नवीन कलरमध्ये उपलब्ध; जाणून घ्या  किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 9 (PC -Wikimedia Commons)

Redmi Note 9: रेडमीचा Redmi Note 9 चा नवीन शेडो ब्लॅक कलर व्हेरिएंट अधिकृतपणे भारतीय बाजारात दाखल झाला आहे. त्यानंतर हा स्मार्टफोन एकूण पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. यात शेडो ब्लॅक कलर व्यतिरिक्त एक्वा ग्रीन, आर्कटिक व्हाइट, पेब्बल ग्रे आणि रेड व्हेरिएंटचा समावेश आहे. Redmi Note 9 हा कंपनीचा पॉकेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे आणि यात क्वाड रियर कॅमेर्‍यासह अनेक उत्कृष्ट फिचर्स देण्यात आले आहेत. कंपनीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, रेडमी नोट 9 चा ब्लॅक कलर व्हेरिएंट 11,499 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. हा स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेल आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाइटवर मर्यादित काळासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. एचडीएफसी बँकेच्या डेबिटद्वारे किंवा क्रेडिटद्वारे फोनच्या पेमेंटवर आपल्याला 1 हजार रुपयांची सूट मिळू शकेल. त्यामुळे ग्राहक हा स्मार्टफोन केवळ 10,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

याशिवाय Redmi Note 9 चा शेडो ब्लॅक कलर व्हेरिएंट 4 जीबी + 128 जीबी स्टोरेज मॉडेल कंपनीच्या वेबसाइटवर 12,499 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. तर युजर्स टॉप एन्ड व्हेरिएंट 14,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात आणि यात 6 जीबी + 128 जीबी स्टोरेज आहे. यावर ग्राहकांना बँक ऑफरचादेखील लाभ घेता येणार आहे. (हेही वाचा - Moto G 5G स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स)

Redmi Note 9 स्पेसिफिकेशन्स -

रेडमी नोट 9 अँड्रॉइड 10 ओएस वर कार्य करतो आणि यात 6.53 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे स्क्रीन रिझोल्यूशन 1080x2340 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ जी 85 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. याशिवाय मायक्रो एसडी कार्ड वापरुन वापरकर्ते 512 जीबी पर्यंतचे स्टोरेज वाढवू शकतात.

दरम्यान, रेडमी नोट 9 मध्ये फोटोग्राफीसाठी क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये प्राथमिक सेन्सर 48 एमपी आहे. तर 8 एमपी अल्ट्रा वाइड अँगल, 2 एमपी मॅक्रो सेन्सर आणि 2 एमपी सेन्सर देण्यात आले आहेत. याशिवाय सेल्फीसाठी 13 एमपीचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी आपल्याला त्यात 5020mAh बॅटरी असेल.