रियलमी इंडियाने जीटी नियो2 (GT Neo2) स्मार्टफोन आज भारतात लॉन्च केला आहे. 17 ऑक्टोबरपासून या स्मार्टफोनच्या सेलला सुरुवात होईल. फ्लिपकार्ट (Flipkart), रियलमी.कॉम (Realme.com) आणि रिटेल स्टोअर्सवरुन या सेलला सुरुवात होईल. रियलमी फेस्टीव्हल डेज सेल (Realme Festive Days Sale) अंतर्गत हा स्मार्टफोनचे 8जीबी+128जीबी वेरिएंट तर 12जीबी+265जीबी वेरिएंट अनुक्रमे 24,999 रुपये आणि 28,999 रुपयांना उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध असेल- Neo Black, Neo Blue आणि Neo Green. त्याचबरोबर कंपनीने Buds Air 2 Green, Brick Bluetooth speaker, GT Neo2 फोनसह गेमिंग अॅक्सेसरीज देखील लॉन्च केल्या आहेत.
Realme Brick Bluetooth Speaker चा सेल 18 ऑक्टोबर दुपारी 12 वाजल्यापासून रियलमीच्या अधिकृत साईट आणि ऑफलाईन स्टोअर्सवर उपलब्ध असेल. रियलमी फेस्टीव्हल डेज सेल अंतर्गत ब्लुट्युथ स्पीकर्स 24,999 रुपयांना उपलब्ध असेल. रियलमी 4K स्मार्ट गुगल टीव्ही स्टीक देखील सेलमध्ये उपलब्ध असेल आणि ती तुम्ही 2,999 रुपयांना खरेदी करु शकाल. Realme Buds Air 2 Green देखील 18 ऑक्टोबर दुपारी 12 पासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. रियलमी फेस्टीव्हल डेज सेलमध्ये इअरबर्ड्स 2,599 रुपयांना उपलब्ध असेल.
Realme GT Neo2 मध्ये 6.62 इंचाचा E4 AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. Qualcomm Snapdragon 870 SoC मध्ये 12GB चा रॅम आणि 256GB चा इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. यात 64MP चा मेन कॅमेरा, 8MP चा अल्टा-वाईल्ड एंगल लेन्स आणि 2MP चा मायक्रो स्नॅपर देण्यात आला आहे. (Flipkart Big Diwali Sale: यंदा फ्लिपकार्टचा दिवाळी सेल 17 ऑक्टोबर पासून; पहा बॅंक ऑफर्स ते Mobiles, TV वर कशा असतील ऑफर्स)
#realmeGTNEO2, a Premium Mid-ranger that Strikes the Perfect Balance with:
👉Snapdragon 870 5G Processor
👉120Hz E4 AMOLED Display
👉65W SuperDart Charge
Starting from ₹24,999*.@Flipkart+ members, Sale at 12 PM, 16 Oct.
1st Sale at 00:00 Hrs, 17th Oct.https://t.co/JqLFykmvDD pic.twitter.com/92e1rpeHQp
— realme (@realmeIndia) October 13, 2021
यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात 5000mAh ची बॅटरी 65W सुपरडार्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. याशिवाय कनेक्टीव्हीटीसाठी यात GPS/A-GPS, NFC, a USB Type-C port, 5G, 4G LTE, Wi-Fi आणि ब्युट्युथ देण्यात आला आहे. Realme GT Neo2 स्मार्टफोनच्या 8जीबी+128जीबी वेरिएंटची किंमत 31,999 तर 12जीबी+256जीबी वेरिएंटची किंमत 35.999 रुपये इतकी आहे.
त्याचबरोबर कंपनीने Realme 4K Smart Google TV Stick देखील लॉन्च केली आहे. या स्टीकची किंमत 3.999 रुपये इतकी आहे. त्याचबरोबर रियलमी बर्ड्स एअर 2 ग्रीन मध्ये noise cancellation फिचर, 25 तासांचे प्लेबॅक, 88ms super-low latency आणि 10mm diamond-class Hi-Fi ड्रायव्हर देण्यात आला आहे. याची किंमत 3299 रुपये इतकी आहे,