Flipkart Big Diwali Sale: यंदा फ्लिपकार्टचा दिवाळी सेल 17 ऑक्टोबर पासून; पहा बॅंक ऑफर्स ते Mobiles, TV वर कशा असतील ऑफर्स
फ्लिपकार्ट (File Photo)

वार्षिक बिग बिलियन डेज सेल (Big Billion Days Sale) नंतर आता फ्लिपकार्ट दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर Flipkart Big Diwali Sale घेऊन येत आहे. ई कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टने या सेलमध्ये मोबाईल, टॅबलेट्स, टीवी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर आकर्षक ऑफर्स असणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान बिग दिवाली सेल हा 17 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे तर 23 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. Flipkart Big Billion Days Sale 2021 मध्ये ग्राहकाला मिळल्या iPhone 12 ऐवजी साबणाच्या वड्या (Watch Video).

प्लस मेंबर्स साठी फ्लिपकार्टचा हा सेल 16 ऑक्टोबरच्या रात्री 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. सध्या देण्यात आलेल्या माहितीनुसार या सेलमध्ये 10% इंस्टंट डिस्काऊंट हे ICICI Bank credit card धारकांना मिळणार आहे तर Axis Bank च्या ग्राहकांना देखील तसेच डिस्काऊंट मिळेल.  नक्की वाचा: Flipkart Dussehra Specials सेलला सुरुवात, ग्राहकांना 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिस्काउंट .

अद्याप फ्लिपकार्टने सेलच्या काळातील डिल्सचे प्रिव्ह्यू दिलेले नाहीत. पण ई कॉमर्सच्या नव्या वेब पेज नुसार, बिग दिवाळी सेल मध्ये स्मार्टफोन आणि टॅबलेट्स वर 80% सूट असेल. इलेक्ट्रोनिक्स आणि अन्य अ‍ॅक्सेसरीजवर 80% पर्यंत सूट असणार आहे.तर टीव्ही आणि अप्लायंसेस वर 75% पर्यंत सूट असणार आहे.

सेल च्या काळात Crazy Deals कॅटेगरी मधील धमाकेदार ऑफर्स या दुपारी 12 वाजता, सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता पाहता येणार आहेत. तर टाईम बॉम्ब डील मध्ये प्रत्येक कॅटेगरी मध्ये संध्याकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत तासाला एक डील असणार आहे.

ई कॉमर्स साईट वर अजून डील्सची माहिती लवकरच मिळण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यातच Flipkart Big Billion Days sale पार पडला आहे.