Flipkart & iPhone 12 (Photo Credits: Flipkart)

सणासुदीचा काळ पाहून मागील आठवडाभरापासून ई कॉमर्स साईट्स अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सेल सुरू आहे. Flipkart च्या Big Billion आणि Amazon च्या Great Indian Festival सेल मध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इयरबर्ड्स आणि स्मार्ट टीव्ही वर धमाकेदार ऑफर्स सुरू आहेत. या सेलमध्ये मोठी डिल्स मिळवण्यासाठी ग्राहक उत्सुक आहेत पण एका ग्राहकाच्या पदरी घोर निराशा आल्याचं पहायला मिळालं आहे. Simranpal Singh या ग्राहकासोबत एक मोठा स्कॅम झाला आहे. नक्की वाचा: Flipkart Dussehra Specials सेलला सुरुवात, ग्राहकांना 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिस्काउंट .

Flipkart Big Billion Days Sale 2021 मधून Simranpal Singh यांनी अंदाजे 53 हजारांचा आयफोन 12 मागवला असताना त्यांना 2 साबणाच्या वड्या मिळाल्याने त्यांना धक्का बसला आहे. आयफोन पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या सिंग यांनी बॉक्स उघडला तेव्हा त्यांना चक्क निरमा साबणाच्या वड्या मिळाल्या.

पहा व्हिडिओ

Simranpal Singh यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार पाहून चालाखी केली. त्यांनी डिलेव्हरी बॉयला ओटीपी शेअर केला नाही. जर त्यांनी तो शेअर केला असता तर ग्राहकाला ऑर्डर मिळाली असा त्याचा अर्थ होतो. त्यांनी फ्लिपकार्टच्या कस्टमर केअरला संपर्क साधला आणि तक्रार नोंदवली. सिंग यांची ऑर्डर रद्द करून फ्लिपकार्टने त्यांचे पैसे परत केले. सिंग यांच्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे अनेकांना धक्का बसला आहे. फ्लिपकार्ट ही अनेकांसाठी विश्वसनीय ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे.