Realme C15 First Online Sale आज दुपारी 12 पासून Flipkart आणि Realme.com वर सुरु; पहा किंमत आणि ऑफर्स
Realme C15 Smartphone Launched (Photo Credits: Realme Indonesia)

चायनीज हँडसेट मेकर कंपनी रियलमी च्या  Realme C15  चा आज पहिला ऑनलाईन सेल (Online Sale) आहे. या सेलची सुरुवात दुपारी 12 पासून फ्लिपकार्ट (Flipkart) आणि रियलमीच्या ऑफिशियल वेबसाईटवर (Realme.com) होणार आहे. या सेलअंतर्गत स्मार्टफोनवर 2000 रुपयांचे डिस्काऊंट मिळत आहे. तसंच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर (Flipkart Axis Bank Credit Cards) 5% अनलिमिडेट कॅशबॅक दिला जात आहे. तर अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डवर (Axis Bank Buzz Credit Cards) 5% सूट मिळत आहे. तसंच नो-कॉस्ट ईएमआय (No-Cost EMI) 1,223 रुपयांपासून सुरु होत आहे.

रियलमी C15 मध्ये 6.5 इंचाचा HD+ LCD मिनी ड्रॉप फुल स्क्रिन डिस्प्ले देण्यात आला असून त्याचे रिजोल्यूशन 1600x720 मेगापिक्सल इतके आहे. या स्मार्टफोनमध्ये कॉर्ड रिअर 13MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. तर 8MP चा अल्ट्रा वाईल्ड एन्गल लेन्स आणि 2MP चा रेट्रो सेन्सर आणि 2MP ची B&W लेन्स देण्यात आली आहे. 8MP चा सेल्फी कॅमेरा AI ब्युटी आणि पोर्टेट मोड सह देण्यात आला आहे.

प्रोसेसर MediaTek Helio G35
रॅम  3GB, 4GB
इंटरनल स्टोरेज (मेमरी)  64GB, 128GB
बॅटरी 6,000mAh
बॅक कॅमेरा 13MP, 8MP, 2MP, 2MP
सेल्फी कॅमेरा 8MP
चार्जिंग सपोर्ट 18W फास्ट चार्गिंग सपोर्ट

Realme Tweet:

या हँडसेटमध्ये MediaTek Helio G35 चा प्रोसेसर, GE8320 GPU देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अॅनरॉईड 10 या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. हा स्मार्टफोन दोन वेरिएंटसमध्ये उपलब्ध आहे- 3GB रॅम+ 64GB स्टोरेज आणि 4GB रॅम+ 128GB स्टोरेज.

Realme C15 (Photo Credits: Realme India)

या बजेट स्मार्टफोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी असून 18W चा क्विक चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. यात कनेक्टीव्हीटीसाठी 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth v5.0, GPS/A-GPS, a Micro-USB port आणि रिअर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. Realme C15 च्या 3GB आणि 64GB वेरिएंटची किंमत 9,999 रुपये इतकी असून 4GB आणि 128GB ची किंमत 10,999 रुपये इतकी आहे.