iPhone विकत घेणाऱ्यांसाठी बंपर कॅशबॅक ऑफर, १०,००० ची सूट
iPhone Xs Max (Photo Credit Official Website)

Apple ने नुकताच कॅलिफोर्नियाच्या स्टीव जॉब्स थिएटरमध्ये ३ नवीन Phones लॉन्च लॉन्च केले आहेत. फोन बरोबरच सीरीज 4 ची प्रतीक्षा सुद्धा आता संपली आहे. iPhone Xs, iPhone Xs Max आणि iPhone XR हे नवे फोन्स iPhone X चे सक्सेसरच्या सीरिजमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. येत्या सणासुदीच्या काळात तुम्ही नवा फोन घेणार असाल तर अनेक ई कॉमर्स कंपन्यांनी आयफोनसाठी धमाकेदार ऑफर्सदेखील आणल्या आहेत. अॅपलचे तब्बल तीन नवीन फोन लाँच, फीचर्स पाहिलेत तर तुम्हीही पडाल प्रेमात

पेटीएम मॉलवर ऑफर

पेटीएम मॉल ( PayTM Mall) ने आयफोनवर सुपर सेल घोषित केला आहे. यामध्ये अॅप्पल स्मार्ट फोन विकत घेणाऱ्यांना तब्बल दहा हजारांचा कॅशबॅक मिळणार आहे. पेटीएमच्या या सेल मधील ऑफर नुसार  आयफोन (iPhone) 7 आणि आयफोन 6एस ४० ते ३० हजार रुपयात विकत घेतला जाऊ शकतो आयफोन 7 वर 5 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळतोय त्यामुळे त्याची किंमत सुमारे 38,474 रुपये झाली आहे.

iPhone  7 गोल्ड वेरिएंट (32जीबी) या स्मार्ट फोनवर १७ % डिस्काऊंट आणि ५ हजारांचा कॅशबॅक आहे. त्यामुळे पेटीएम मॉलवर केवळ ३८,४७४ रुपयांत हा फोन उपलब्ध होईल.

iPhone 6 s वर ४ हजारांचा कॅशबॅक असल्याने तो फोन २८,३९९ रुपयांमध्ये उपलब्ध होईल. iPhone 6 s 32 जीबी वेरिएंट 32,399 रुपयांमध्ये उपलब्ध होईल यावर २४% डिस्काऊंट मिळेल.

अॅप्पल वॉच सीरीज 4

Apple Watch ने नव्या जनरेशनची अॅप्पल वॉच सीरीज 4 लॉन्च केली आहे. हे ईसीजी करणारं पहिलं स्मार्ट वॉच आहे. ईसीजीचा रिपोर्ट पीडीएफ स्वरूपात पाठवण्यात येतो.