बहुचर्चित असलेली ऑप्टी बाईक आर 22 एव्हरेस्ट (Optibike ने R22 Everest) ई-बाइक लॉन्च झाली आहे. नावावरुनच कळते की, ही बाईक माऊंट एव्हरेस्टसारक्या पर्वतावरही चढू शकते. कंपनीने दावा केला आहे की, ही बाईक एकदा चार्ज केल्यावर एकदोन नव्हे तर तब्बल 300 मैल म्हणजेच 483 किमी अंतर कापू शकते. थोडक्यात सांगायचे तर 500 किलोमीटर इतके अंतर सहज पार करु शकेल इतकी ताकदवान अशी ही बाईक आहे. दरम्यान, बाईकच्या रेंजबद्दल कंपनीने काही परिमान आखून दिले आहे. ज्यात चालकाचे वजनावर वेग अवलंबून असेल असा कंपनीचा दावा आहे. बाईकमध्ये डबल बॅटरी सिस्टम देण्यात आली आहे. तसेच, इतरही काही अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
किंमतत आणि फिचर्स
बाईकच्या किंमत आणि फिचर्स बाबत सांगायचे तर ही बाईक केवळ 18,900 अमेरिकी डॉलर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये फक्त 14.96 लाख रुपये इतक्या किमतीला उपलब्ध आहे. आपण ओळखले असेल की फक्त 14.96 लाख रुपये किमतीची बाईक कोणाला परवडू शकते. कंपनीच्या वेबसाईटवर बाईकबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार ही Optibike मर्यादीत दुकानांमधून खरेदी करता येऊ शकते. (हेही वाचा, Upcoming Cars: महिंद्रा स्कॉर्पिओ-एन एसयूव्हीचे भारतात अनावरण, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये)
Optibike R22 Everest e-bike फिचर्स
- Optibike R22 Everest इलेक्ट्रिक बाइक एक पॉवरच्या रुपात सादर करणयात आली आहे. ज्यात अनेक फीचर्स पाहायला मिळतात.
- एकदा चार्जिंग करता कापते 483 किलोमीटर अंतर.
- 483 किलोमीटर पार कडण्यासाठी बाईकस्वाराचे वजन साधारण 73 किलो पेक्षा अधिक असू नये.
- 73 किलो पेक्षा कमी वजनाचा बाईकस्वार प्रति तास 25 किमी या वेगाने 483 किलोमीटर अंतर सहज पार करु शकतो.
- बाईकला 3,260 Wh डबल बॅटरी पॅक देण्यात आले ज्याच वजन केवळ 16 किलोग्रॅम आहे.
ही बाईक माऊंट एव्हरेस्टसारख्या पर्वतावरही चढू शकते असा कंपनीचा दावा आहे.
पॉवर निर्मिती
बाईकला 1,700 W इतक्या शक्तीची मोटर जोडली आहे. जी 2500W इतकी पीक पॉवर निर्मिती करते. तसेच, ही बाईक प्रति तास 58 किलोमीटर वेगानेही धावते. बाईक निर्मिती कंपनीने म्हटले आहे की, यात Optibike PowerStorm MBB सिस्टम आहे. ज्यामुळे ही इलेक्ट्रिक बाइक 40% चढणही सहज पार करु शकते. बाईकला पायंडलही आहे. त्यामुळे आपण त्याचाही वापर करुन ही बाईक वापरु शकता. बाईकची स्टेबिलीटी कायम राहावी यासाठी R22 Everest ई-बाइक मध्ये डाऊनहील ड्युअल क्राऊन फॉर्क देण्यात आला आहे. तसेच, एक्सटेंडेड ट्रॅव्हल सस्पेन्शन सुद्धा असणार आहे. पॉवरसाठी यात 5 लेव्हल देण्यात आल्या आहेत. ज्यापैकी एक आपण निवडुू शकता. बाईकला ईलेक्ट्रिक एलसीडी डिस्प्लेसुद्धा आहे. बाईकचे वजन 42 किलोग्राम आहे.