तीन रियर कॅमेरे आणि 48MP रियर कॅमे-यासह लाँच झाला Nubia Z20, पाहा याची ठळक वैशिष्ट्ये
Nubiz Z20 (Photo Credits: Twitter)

आकर्षक कॅमेरा आणि उत्कृष्ट स्टोरेज फिचर्स असलेला नूबिया कंपनीचा Nubia Z20 स्मार्टफोन नुकताच चीनमध्ये लाँच झाला. नूबिया च्या फ्लॅगशिप फोनच्या फ्रंट पॅनलवर कर्व्ड एज डिस्प्ले आहे. फोनच्या मागील बाजूस फ्लेक्सिबल एमोलेड डिस्प्ले दिली गेली आहे. कंपनीने चीनमध्ये आपल्या अधिकृत वेबसाइटवर प्री-ऑर्डर घेणे सुरु केले आहे. त्याचबरोबर ई-कॉमर्स पोर्टल Jingdong Mall, Suning आणि Tmall सुद्धा प्री-ऑर्डर वर मिळत आहे. या हँडसेटची विक्री 16 ऑगस्टपासून चीनमध्ये सुरु होईल.

Nubia Z20 ची किंमत:

या स्मार्टफोनच्या किंमतीविषयी बोलायचे झाले तर, Nubiz Z20 च्या 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 3499 चीनी युआन (जवळपास 35,200 रुपये), 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्मार्टफोनची किंमत 3,699 चीनी युआन (जवळपास 37,200 रुपये), 8GB रॅम आणि 512GB स्टोरेज स्मार्टफोनची किंमत 4,199 चीनी युआन (जवळपास 42,200 रुपये) इतकी आहे.

Nubia Z20 वैशिष्ट्ये:

या स्मार्टफोनमध्ये 6.42 इंचाची फुल एचडी डिस्प्ले देण्यात आली असून बॅक पॅनलवर 5.1 इंचाची एचडी देण्यात आली आहे. Nubiz Z20 मध्ये ड्यूल नॅनो सिम असून अॅनड्रॉईड 9 Pie वर आधारित आहे. याच्या स्टोरेजविषयी बोलायचे झाले तर, यात ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसरसह 8GB रॅम आणि 512GB चा स्टोरेज देण्यात आला आहे.

हेही वाचा- Flipkart-Amazon वर सेल सुरु, ग्राहकांची चांदी, कपडे, मोबाईलसह या वस्तूंवर मिळतायत बंपर डिस्काउंट, वाचा सविस्तर

या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, फोनच्या फ्रंट पॅनलवर वेगळा सेल्फी कॅमेरा देण्यात आला नसून, रियर कॅमेरा सेटअपनेच तुम्ही सेल्फी काढू शकता. फोनच्या मागील बाजूस 3 रियर कॅमेरे देण्यात 48MP चा प्रायमरी सेंसरसह 16MP चा सेकंडरी सेंसर आणि टेलिफोटो लेंससह 8MO चा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. कॅमे-यामध्ये 3X लॉसलेस झूम आणि 30X डिजिटल झूम सपोर्टसुद्धा देण्यात आला आहे.

याच्या कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर, यात 4G LTE, वायफाय 802.11 एसी, ब्लूटुथ व्हर्जन 5.1, जीपीएस/ए-जीपीएस आणि युएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश करण्यात आला आहे. यात 4000mAh ची बॅटरी देण्यात आली असून 27 वॉट चा फास्ट चार्जिंग सपोर्ट सुद्धा दिला गेला आहे.