Flipkart-Amazon वर सेल सुरु, ग्राहकांची चांदी, कपडे, मोबाईलसह या वस्तूंवर मिळतायत बंपर डिस्काउंट, वाचा सविस्तर
Flipkart-Amazon (Photo Credits: Facebook)

ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अॅमेझॉनवर (Amazon) आजपासून जबरदस्त सेल सुरु झाला आहे. यात फ्लिपकार्टवर नॅशनल शॉपिंग डेज हा सेल सुरु झाला असून 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्टदरम्यान हा सेल असणार आहे. तर अॅमेझॉनवर 8 ते 11 ऑगस्टदरम्यान फ्रिडम सेल सुरु झाला आहे. या दोन्ही सेलमध्ये घरगुती आणि रोजच्या वापरातील वस्तूंसह गॅजेट्सवरही दमदार ऑफर्स मिळत आहेत. यात फ्लिपकार्टवरील सेलमध्ये ICICi क्रेडिट आणि Debit कार्ड धारकांना एक्स्ट्रा 10% डिस्काउंट मिळत आहे. तर अॅमेझॉन इंडियाच्या सेलमध्ये SBI क्रेडिट कार्डधारकांसाठी अतिरिक्त 10% सूट मिळत आहे.

अॅमेझॉनवरील फ्रिडम डेज सेलमध्ये रोजच्या वापरातील वस्तूंवर, कपडे आणि चपलांच्या खरेदीवर 70% पर्यंतची सूट मिळत असून फिटबँडवर 6250 रुपयांपर्यंत तर स्टोरेज डिवायसेस (पेन ड्राइव, हार्ड ड्राइव,मेमरी कार्ड इ.)वर 50% पर्यंतची सूट मिळत आहे.

हेही वाचा- Flipkart National Shopping Days: फ्लिपकार्ट सेल मध्ये ASUS कंपनीच्या दमदार स्मार्टफोनवर 5 हजार रुपयांपर्यंत सूट

तर फ्लिपकार्टवरील नॅशनल शॉपिंग डेज सेलमध्ये कपडे, खेळणी, सौंदर्य प्रसाधने यांसारख्या गोष्टींवर 3 वस्तू खरेदी केल्यावर अतिरिक्त 10% सूट आणि 4 वस्तू खरेदी केल्यावर अतिरिक्त 15% सूट मिळत आहे.

फ्लिपकार्टवरील स्मार्टफोन्स ऑफर्स:

-Asus Zenfone 5Z

सेलमध्ये असुस झेनफोन 5Z च्या सीरिजमधील 6GB,8GB,256GB वेरियंटवर 5 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. तसेच 6GB रॅम असणाऱ्या असुसच्या स्मार्टफोनची किंमत 24,999 रुपयांवरुन 19,999 रुपये करण्यात आली आहे. तसेच 8GB रॅम असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 28,999 रुपयांवरुन 23,999 रुपये करण्यात आली आहे.

-Redmi Note 7s

4GB रॅम आणि 64GB चे अंतर्गत स्टोरेज असलेला 13,999 रुपयाचा रेडमी नोट 7s Sapphire Blue रंगाचा स्मार्टफोन या ऑफर्समध्ये 11, 999 रुपयांना मिळत आहे.

-Realme 3 Pro

6GB रॅम आणि 128GB चे अंतर्गत स्टोरेज असलेला 19,999 रुपयांचा स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेलमध्ये 15,999 रुपयांत मिळत आहे.

-Asus Zenfone Max Pro M11

झेनफोन मॅक्स प्रो M11 हा तीन वेरियंटमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. त्यानुसार या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना 500 रुपयापर्यंत सूट देण्यात आली आहे. झेनफोन मॅक्स प्रो M11 या स्मार्टफोनची किंमत 7,499 रुपये करण्यात आली आहे.

अॅमेझॉनवरील स्मार्टफोन्स ऑफर्स:

-Samsung Galaxy M40

6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज असलेला 20,490 रुपयांचा स्मार्टफोन अॅमेझॉन ऑफरमध्ये 19,990 रुपयांना मिळत आहे. यात डिस्प्ले कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

-OnePlus 6T

8GB रॅम आणि 128GB चे अंतर्गत स्टोरेज असलेला 41,999 रुपयांचा स्मार्टफोन तुम्हाला ऑफरमध्ये 26,399 रुपयांत मिळत आहे.

-Redmi 7

3GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेज असणारा हा स्मार्टफोन 8,499 रुपयांना मिळत आहे. यात 12MP+2MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

-Redmi Y2 (Gold, 4GB RAM, 64GB Storage)

4GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेज असलेला रेडमी Y2 हा स्मार्टफोन तुम्हाला 7,999 रुपयांत मिळत आहे.

हेही वाचा- Amazon Freedom Sale: अ‍ॅमेझॉन फ्रिडम सेलमध्ये 'या' शानदार स्मार्टफोनवर मिळणार भरघोस सूट, जाणून घ्या

-OPPO K3

6G रॅम आणि 64GB चे स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन 16,990 रुपयांत मिळत आहे. यात 16MP+2MP चा ड्यूल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

या आणि यांसारख्या ब-याच गॅजेट्सवर तुम्हाला या सेलमध्ये जबरदस्त ऑफर्स मिळत आहे. तसेच फिटनेससंबंधीची प्रोडक्सही तुम्हाला या सेलमध्ये चांगल्या ऑफर्ससहित मिळत आहे.