Flipkart National Shopping Days: फ्लिपकार्ट सेल मध्ये ASUS कंपनीच्या दमदार स्मार्टफोनवर 5 हजार रुपयांपर्यंत सूट
Flipkart National Days Sale (Photo Credits-Twitter)

इ-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart ) त्यांच्या ग्राहकांसाठी National Shopping Days सेल घेऊन आला आहे. हा सेल 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये असुस कंपनीच्या दमदार स्मार्टफोन्सवर भरघोस सूट देण्यात येणार आहे. तसेच असुस (ASUS) कंपनीचे सर्वाधिक विकले जाणारे स्मार्टफोन ठरवलेल्या कालावधीत ग्राहकांना सूटची संधी घेत खरेदी करता येणार आहे. जर तुम्ही फ्लिपकार्ड प्लस ग्राहक असाल तर तुम्हाला या सेलचा सदुपयोग उद्या रात्रीपासून करता येणार आहे.

ICC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरुन असुसचा स्मार्टफोन तुम्ही खरेदी केल्यास त्यावर 10 टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच स्मार्टफोन प्रोटेक्शन सीरिज सुद्धा तुम्हा मिळणार आहेत. त्याचसोबत 3-6 महिन्याच्या नो- कॉस्ट इएमआयवर तुम्ही ऑर्डर करु शकता. तर जाणून घ्या असुस कंपनीच्या या स्मार्टफोनवर तब्बल 5 हजार रुपयापर्यंत सूट देण्यात येणार आहे.

-असुस झेनफोन 5Z

सेलमध्ये असुस झेनफोन 5Z च्या सीरिजमधील 6GB,8GB,256GB वेरियंटवर 5 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. तसेच 6GB रॅम असणाऱ्या असुसच्या स्मार्टफोनची किंमत 24,999 रुपयांवरुन 19,999 रुपये करण्यात आली आहे. तसेच 8GB रॅम असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 28,999 रुपयांवरुन 23,999 रुपये करण्यात आली आहे.

-असुस झेनफोन मॅक्स प्रो M11

झेनफोन मॅक्स प्रो M11 हा तीन वेरियंटमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. त्यानुसार या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना 500 रुपयापर्यंत सूट देण्यात आली आहे. झेनफोन मॅक्स प्रो M11 या स्मार्टफोनची किंमत 7,499 रुपये करण्यात आली आहे.

-झेनफोन मॅक्स M1

या स्मार्टफोनवर ग्राहकांना 500 रुपयापर्यंत सूट देण्यात येणार आहे.तसेच फ्लिपकार्ट सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत 6,499 रुपये ठेवण्यात आली आहे.(Amazon Freedom Sale: अ‍ॅमेझॉन फ्रिडम सेलमध्ये 'या' शानदार स्मार्टफोनवर मिळणार भरघोस सूट, जाणून घ्या)

त्याचसोबत असुस कंपनीच्या फ्लॅगशिपमधील नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. तर या असुस 6Z या स्मार्टफोनवर ग्राहकांना एक्सचेंज ऑफर्सच्या माध्यमातून सेलमध्ये जवळजवळ 3 हजार रुपयांची सूट देण्यात येणार आहे. तसेच झेनफोन मॅक्स M2 स्मार्टफोन ग्राहकांना 8,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.