अंतराळात (Space) जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी नासा (NASA) एक चांगली बातमी घेऊन येत आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा टेक्सास आधारित स्टार्टअप Axiom Spaceच्या सहकार्याने, पर्यटकांसाठी स्पेस होम (Space Home) तयार करण्याची तयारी करत आहे. ही जागा आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात तयार केली जाईल. अॅक्सियम स्पेसने स्पेस होमचा कॉन्सेप्ट आणि फोटोही प्रसिद्ध केले आहेत. यात क्रू क्वार्टर आणि 360 डिग्री अर्थ ऑब्जर्व्हेटरी विंडो आहे. ज्याद्वारे पर्यटक येथे राहू शकतील आणि पृथ्वीचे नयनरम्य दृश्य पाहू शकतील. 2024 पर्यंत हे तयार होईल अशी अपेक्षा आहे.
अंतराळ पर्यटनाला चालना देण्यासाठी नासा असे स्पेस होम तयार करण्याची तयारी करत आहे. नासाने म्हटले आहे की, अॅक्सियम विभागात तीन विभाग असतील- नोड मॉड्यूल, रिसर्च अँड मॅन्युफॅक्चरिंग फॅकल्टी आणि लार्ज-विंडो अर्थ ऑब्जर्व्हेटरी असलेले क्रू हॅबिटेट युनिट आहेत. हे विभाग सहजपणे आयएसएसशी कनेक्ट केले जातील. नासाची ही सर्वात मोठ्या कामगिरी पैकी एक असेल. गेल्या वर्षी 2020 नंतर आयएसएसला पर्यटक पाठवण्याची योजना नासाने जाहीर केली होती.
या स्पेस होममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रेलिंग्ज लावण्यात आले आहेत, ज्यायोगे त्याचा उपयोग शून्य गुरुत्वाकर्षणावर थांबण्यासाठी केला जाऊ शकेल. याशिवाय यात वाय-फाय, एलईडी, आरसा, काचेची विंडो अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. नासा हा प्रकल्प व्यावसायिकरित्या उपयोगात आणणार आहे. या प्रकल्पाद्वारे अनेक पर्यटकांना एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेण्याची संधी मिळत आहेत. याची गोष्टीची नक्की कोणत्या प्रकारे प्रक्रिया पार पडणार आहे याची माहिती लवकरच नासाकडून देण्यात येईल.