X Banned Over 1.9 lakh Accounts in India: इलॉन मस्क संचालित X मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने 26 मे ते 25 जून दरम्यान भारतात 1,94,053 खात्यांवर बंदी घातली आहे. ज्यात मुख्यतः बाल लैंगिक शोषण आणि गैर-सहमतीने नग्नतेचा प्रचार केला जात असणाऱ्या खात्यांचा समावेश आहे. इलॉन मस्कच्या सतत एक्ससाठी फायदेशीर ठरणारे कठोर निर्णय घेत असतात. ज्यात आता त्यांनी एकूण 196,044 खात्यांवर बंदी घातली. एकट्या जून महिन्यात ही कारवाई करण्यात आली आहे.
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने, नवीन IT नियम, 2021 चे पालन करून आपल्या मासिक अहवालात म्हटले आहे की, भारतातील वापरकर्त्यांकडून 12,570 तक्रारी प्राप्त झाल्या. याव्यतिरिक्त, कंपनीने 55 तक्रारींवर प्रक्रिया व्यक्त केली. ज्यात खाते निलंबनाचे आवाहन होते. या आधीही, 26 एप्रिल ते 25 मे दरम्यान, X ने देशातील 2,29,925 खात्यांवर बंदी घातली होती.