Motorola India येत्या 17 ऑगस्ट रोजी त्यांची Edge 20 सीरिज लॉन्च करणार आहे. तत्पूर्वी एज 20 आणि एज 20 फ्युजन स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन त्यांच्या अधिकृत ट्विटर आणि अन्य सोशल मीडिया अकाउंटवर झळकवले आहेत. मोटोरोला एज 20 बद्दल काही गोष्टी समोर आल्या होत्या. मात्र आता मोटोरोला एज 20 सीरिज मधील दोन्ही स्मार्टफोनच्या किंमती लीक झाल्याचे समोर आले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार Debayan Roy याने असे म्हटले आहे की, मोटोरोला एज 20 फ्युजन हा दोन वेरियंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. तर एज 20 स्मार्टफोन हा फक्त सिंगल वेरियंट मध्ये ग्राहकांना उपलब्ध करुन दिला जाऊ शकतो. मोटोरोला एज 20 फ्युजन याची किंमत अंदाजे 21,499 रुपये असून यामध्ये 6GB+128GB मॉडेल खरेदी करता येणार आहे. तर 8GB+128GB वेरियंट हा 23,999 रुपयांना उपलब्ध करुन दिला जाऊ शकतो.(WhatsApp Voice Call Recording: या सोप्या 10 स्टेप्सने करा व्हॉट्सअॅप व्हॉईस कॉल रेकॉर्ड)
Tweet:
Use your apps on the big screen and unleash your phone’s true potential with ‘Ready For! Stay tuned to know more as #motorolaedge20 & #motorolaedge20fusion launch on 17th Aug, 12 PM on @Flipkart. Ready to #FindYourEdge? https://t.co/zifPClYrfu pic.twitter.com/mqBnD07dcS
— Motorola India (@motorolaindia) August 12, 2021
दुसऱ्या बाजूला मोटोरोला एज हा 29,999 रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. यामध्ये 8GB+128GB स्टोरेज दिला जाऊ शकतो. मोटोरोला एज 20 सीरिज ही फ्लिपकार्टवर सुद्धा लिस्टिंग करण्यात आली आहे. यामुळे असे कळते की, हे स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. मोटोरोला एज 20 साठी 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले आणि 144Hz रिफ्रेश रेटसह येणार आहे. तसेच ट्रिपर रियर कॅमेरा दिला जाणार असून यामध्ये मुख्य लेन्स ही 108MP, दुसरा कॅमेरा 16MP आणि तिसरा 8MP चा असणार आहे.
तसेच मोटोरोला एज 20 फ्युजसाठी 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेट रेटसह मिळू शकतो. फोटोग्राफीसाठी यामध्ये 108MP ची प्रायमरी लेन्स, 8MP चा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP चा डेप्थ दिला जाणार आहे. दोन्ही मोटोरोला एज 20 आणि एज 20 फ्युजन मध्ये अनुक्रमे 4,000mAh आणि 5,000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे.