WhatsApp Voice Call Recording: या सोप्या 10 स्टेप्सने करा व्हॉट्सअॅप व्हॉईस कॉल रेकॉर्ड
WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

WhatsApp Voice Call Recording: व्हॉट्सअॅप दरवेळी युजर्सच्या सोयीसाठी नवनवे फिचर्स अपडेट करत असतं. व्हॉट्सअॅप दीर्घ काळापासून व्हॉईस कॉलिंगची सुविधा देत आहे. परंतु, व्हॉईस रेकॉर्डिंगसाठी कोणत्याही पर्याय देण्यात आला नव्हता. त्यामुळे व्हॉईस कॉल रेकॉर्ड करणे युजर्संना शक्य होत नव्हते. मात्रा आता व्हॉईस रेकॉर्डिंगचा पर्याय खुला करण्यात आला आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप वरील व्हॉईस कॉल तुम्ही रेकॉर्ड करु शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. जाणून घेऊया काय आहेत त्या स्टेप्स.... (WhatsApp Messages किबोर्डचा वापर न करता कसे पाठवाल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स)

# तुम्ही जर अॅनरॉईड फोन युजर असाल तर त्यासाठी तुम्हाला एक थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड करावा लागेल.

# Cube Call Recorder असे या अॅपचे नाव असून ते डाऊनलोड करा.

# हे अॅप ओपन केल्यानंतर व्हॉट्सअॅप वर जा.

# त्यानंतर ज्या व्यक्तीचे बोलणे रेकॉर्ड करु इच्छित आहात त्याला कॉल करा,

# यादरम्यान तुम्हाला क्युब कॉल विजेट दिसत असेल तर याचा अर्थ तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे.

# परंतु, इरर येत असले तर क्युब कॉल रेकॉर्डर पुन्हा एकदा ओपन करा.

# सेटिंग्स मध्ये जावून व्हॉईस कॉल मध्ये फोर्स वोईप वर क्लिक करा.

# या प्रोसेस दरम्यान पुन्हा व्हॉट्सअॅप कॉल करा.

# तुम्हाला क्युब कॉल विजेट दिसून येईल.

# परंतु, पुन्हा क्युब कॉल विजेट दिसत नसले तर याचा अर्थ तुमचा फोन त्याला सपोर्ट करत नाही.

आयफोन युजर्स असल्यास:

# सर्वप्रथम आयफोनला लायटनिंग केबलच्या मदतीने MaC ने कनेक्ट करा.

# त्यानंतर आयफोनवर Trust this computer दिसेल त्यावर क्लिक करा.

# पहिल्यांदा मॅकने आयफोन कनेक्ट करत असाल तर तो QuickTime ओपन करा.

# त्यानंतर फाईल सेक्शनमध्ये जाऊन न्यू ऑडिओ रेकॉर्डिंगचा पर्याय दिसेल.

# रेकॉर्ड बटणाच्या खाली अॅरो दिसेल.

# त्या अॅरोवर क्लिक करा आणि आयफोनचा ऑप्शन सिलेक्ट करा.

# त्यानंतर Quick Time मध्ये रेकॉर्ड बटणावर क्लिक करा.

# आता व्हॉट्सअॅप कॉल करा. व्हॉईस कॉल रेकॉर्ड होऊ लागेल. ते तुम्ही सेव्ह देखील करु शकता.

हे फिचर युजर्सच्या नक्कीच फायद्याचे ठरेल. याद्वारे व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी अजून एक सुविधा प्रदान केली आहे.