Motorola Moto G8 Power Lite हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात भारतात लॉन्च झाला. आज या हँडसेटचा ऑनलाईन सेल फ्लिपकार्टवर (Flipkart) सुरु होत आहे. दुपारी 12 पासून या सेलला सुरुवात होणार असून या मोबाईलवर 1000 रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डचा (Axis Bank Buzz Credit Card) वापर केल्यास मोबाईलवर तुम्हाला 10% डिस्काऊंट मिळेल. तसंच हा मोबाईल खरेदी करण्याासाठी नो कॉस्ट ईएमआय (No Cost EMI) आणि सँडर्ट ईएमआयचा (Standard EMI) पर्याय देखील उपलब्ध आहे.
मोटोरोलाच्या या मोबाईलमध्ये 6.5 इंचाचा मॅक्स व्हिजन LCD वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला असून 1600x720 पिक्सलचे स्क्रिन रिजोल्यूशन देण्यात आले आहे. या मोबाईलमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला असून 16MP ची मेन लेन्स 2MP मायक्रो सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या मोबाईल मध्ये 5000mAh ची बॅटरी असून 10 व्हॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
पहा व्हिडिओ:
या मोबाईलमध्ये फास्ट प्रोसेसिंगसाठी मीडिया टेकचा Helio P35 चा प्रोसेसर दिला आहे. या मोबाईलमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल मेमरी दिली असून अॅनरॉईड 9 पाय ऑपरेटिंग सिस्टमवर कार्यरत आहे. हा मोबाईल रॉयल ब्लू आणि आर्टिक या दोन कलर शेड्समध्ये उपलब्ध आहे. Moto G8 Power Lite या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये आहे.