मोटोरोला (Motorola) कंपनीने मोटो ई7 प्लस (Moto E7 Plus) स्मार्टफोन आज भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन ब्राझीलमध्ये दोन आठवड्यांपूर्वी लॉन्च करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनचे एक एक फिचर फ्लिपकार्टवर जाहीर करण्यात येत होते. आज दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन लॉन्च होणार असून फ्लिपकार्टवर सेलच्या माध्यमातून तो विक्रीस उपलब्ध असेल. Moto E7 Plus मध्ये 6.5 इंचाचा HD+ waterdrop notch डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यात क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 460 चिपसेट देण्यात आला असून त्यात 4GB ची रॅमही देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48MP चा प्रायमरी सेन्सर देण्यात आला असून 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसंच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा सेल्फी शूटर कॅमेरा देण्यात आला आहे.
पहा ट्विट:
The #UltimateCamera experience awaits you! The all-new #motoe7plus is launching tomorrow at 12 PM on @Flipkart at an unbelievable price! Any guesses? ;) https://t.co/QzfBzbKV46 pic.twitter.com/qLx31OdarY
— Motorola India (@motorolaindia) September 22, 2020
मोटो ई7 प्लस मध्ये 5,000mAh ची बॅटरी 10W फास्ट चार्गिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. तसंच कनेक्टीव्हीसाठी 4G, ब्लुट्युथ v5, वायफाय 802.11 b/g/n, micro-USB port, GPS, a 3.5 ऑडिओ जॅक आणि रिअर फिंगरप्रींट स्नॅनर देण्यात आले आहे.
प्रोसेसर | MediaTek Helio G25 SoC |
रॅम | 4GB |
इंटरनल स्टोरेज (मेमरी) | 64GB |
बॅटरी | 5000mAh |
बॅक कॅमेरा | 48MP, 2MP |
सेल्फी कॅमेरा | 8MP |
चार्जिंग सपोर्ट | 10W |
या स्मार्टफोन एकाच वेरिंएटमध्ये उपलब्ध असून यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आला आहे. याची किंमत 13,000 रुपये आहे. हा बजेट स्मार्टफोन आहे. त्यामुळे गिफ्ट देण्यासाठी चांगला पर्याय आहे. तुम्हीही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या स्मार्टफोनचा नक्कीच विचार करु शकता.