देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून सरकारने लॉकडाउनचे आदेश येत्या 3 मे पर्यंत वाढवले आहेत. त्यामुळे या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांना पुरवल्या जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच पार्श्वभुमीवर आता येत्या 20 एप्रिल पासून इलेक्ट्रॉनिक वस्तू विकण्यासाठी ई-कॉमर्स वेबसाईट्सला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये मोबाईल फोन, टीव्ही, रेफ्रिजरेटर, लॅपटॉप आणि स्टेशनरी वस्तूंची विक्री सुरु करण्यात येणार आहे. या वस्तू ग्राहकांना ई-कॉमर्स वेबसाईट्स म्हणजे फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि स्नॅपडिल येथून खरेदी करता येणार आहेत.
लॉकडाउनच्या काळात ऑनलाईन वस्तू खरेदी करता तर येणार आहेत. मात्र बुकिंग केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी करण्यासाठी लागणारी गाडी यासाठी परवानगी घेणे कंपनीला गरजेचे आहे. लॉकडाउन दरम्यान व्यावसायिक आणि खासगी आस्थापनांना ऑपरेट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच आवश्यक वाहनांना वाहतूकीसाठी परवानगी देण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे. यापूर्वी गृहमंत्रालयाने ई-कॉमर्स वेबसाईट्सला अत्यावश्यक सेवासुविधा म्हणजेच फुड, वैद्यकिय औषधे किंवा साधनांसाठी परवानगी दिली होती.(खुशखबर! Apple ने सादर केला सर्वात स्वस्त iPhone SE 2; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये)
Mobile phones, televisions, refrigerators, laptops and stationary items will be allowed to be sold through e-commerce platforms like Amazon, Flipkart and Snapdeal from April 20 during lockdown: Officials
— Press Trust of India (@PTI_News) April 16, 2020
बुधवारी जाहीर केलेल्या मार्गदर्शकतत्त्वांमध्ये आवश्यक आणि अनावश्यक वस्तूंचे वर्गीकरण करण्यात आले नाही. परंतु 25 मार्चपासूनल लॉकडाउनचे आदेश लागू केल्यानंतर बंद पडलेल्या औद्योगिक व व्यावसायिक कार्याला चालना देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांप्रमाणे या निर्णयाकडे पाहिले जात आहे. ई-कॉमर्स वेबासाईट्ससाठी मोठ्य संख्यने लोक काम करतात. ऑनलाईन पद्धतीने खरेदी केलेल्या वस्तूची डिलिव्हरी करण्यासाठी वाहनचालकासोबत अजून एक व्यक्ती असणार असून वाहन परवाना असणे अनिवार्य असणार आहे.