खुशखबर! Apple ने सादर केला सर्वात स्वस्त iPhone SE 2; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
iPhone SE 2020 (Photo Credits: Twitter/@MKBHD)

टेलिफोन विश्वातील दिग्गज कंपनी Apple ने आज आपला कमी दरातील आयफोन एसई 2 (iPhone SE 2) किंवा आयफोन 9 (iPhone 9) बाजारात आणला आहे. हा कंपनीचा दुसरा सर्वात स्वस्त मोबाइल फोन आहे. यापूर्वी 2016 मध्ये कंपनीने आयफोन एसई लाँच केला होता. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला एसई-2 आज कंपनीने बाजारात आणला. यापूर्वी अशी अपेक्षा केली जात होती की, Apple आयफोन एसई 2 मार्च 31 रोजी लाँच करेल, परंतु हे शक्य झाले नाही. आयफोन एसई  (2nd Gen) ब्लॅक, व्हाईट आणि प्रॉडक्ट रेडमध्ये 64 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबी मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे.

Apple च्या या फोनची भारतामधील किंमत 42500 रुपयांपासून सुरू होईल. हा आयफोन (XR) पेक्षा स्वस्त आहे.

iPhone SE (2nd Gen) ची वैशिष्ट्ये-

डिस्प्ले- iPhone SE (2nd Gen) मध्ये 4.7 इंचाचा रेटिना एचडी डिस्पले त्याचबरोबर A13 Bionic चिप दिली आहे. आयफोन 11 सिरीजमध्येही अशीच चिप दिली गेली आहे.

कॅमेरा - iPhone SE (2nd Gen) मध्ये 12 एमपीचा मागील कॅमेरा आहे. F / 1.8 तंत्रज्ञानासह कॅमेरा लॅश केला आहे, ज्यामुळे रात्रीचे फोटो उत्तम येऊ शकतात. आयफोन एक्सआरमध्ये हाच कॅमेरा वापरण्यात आला आहे. सेल्फी कॅमेर्‍याबद्दल सांगायचे तर तो 7 एमपीचा  आहे. नवीन आयफोनसह आपण 4 के व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.

डिझाईन - डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, हा नवीन आणि स्वस्त आयफोन जुन्या आयफोन 8 सारखा दिसत आहे. यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सरसह टच आयडी बटण देखील देण्यात आले आहे. हा फोन तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. (हेही वाचा: खुशखबर! Airtel ने आणला 'Work From Home' करणा-यांसाठी जबरदस्त प्लान, 399 रुपयांत मिळणार 50GB डेटा)

फोनचा मुख्य भाग ग्लास आणि एरोस्पेस ग्रेड अॅल्युमिनियमपासून बनलेला आहे. फोनमध्ये वायरलेस चार्जिंगला सपोर्ट देखील आहे. असा दावा केला जात आहे की, आयफोन एसई 2 ची बॅटरी 30 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. मात्र यासाठी स्वतंत्र 18 वॅटचे चार्जर विकत घ्यावे लागेल, जो कंपनीने सादर केला आहे.