Mi10T आणि Mi10T Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन यापूर्वी ग्लोबली लॉन्च केले गेले आहेच. Mi10T आणि Mi10T Pro मध्ये Octa-Core Qualcomm Snapdragon प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसोबत येणार आहेत. त्याचसोबत यामध्ये हाय रिफ्रेश्ड रेटचा सपोर्ट मिळणार आहे. (Flipkart Big Billion Days Sale 2020: फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल मध्ये Realme च्या 'या' जबरदस्त स्मार्टफोन्सवर मिळणार भन्नाट सूट)
स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास Mi10T हा दोन स्टोरेज वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. याच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरियंटची किंमत 35,999 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 128GB वेरियंटची किंमत 37,999 रुपये आहे. दुसऱ्या बाजूला Mi10T Pro स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB वेरियंट ची किंमत 39,999 रुपये आहे. म्हणजेच दोनही स्मार्टफोनसाठी 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज दिला असून त्यात फक्त 2 हजार रुपयांचा फरक आहे. तर स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास या दोन्ही स्मार्टफोनच्या प्रायमरी कॅमेऱ्यामध्ये सुद्धा अंतर आहे. Mi10T Pro चा प्रायमरी कॅमेरा 108MP सेंसरसह येणार आहे. तर Mi10T स्मार्टफोन 64MP प्रायमरी कॅमेऱ्यासह येणार आहे.
Mi10 T स्मार्टफोन Aurora Blue, Cosmic Black आणि Lunar Silver कलर ऑप्शनमध्ये येणार आहे. Mi10T आणि Mi10T Pro दोन्ही स्मार्टफोन 16 ऑक्टोंबर पासून Mi.com आणि Flipkart येथून प्री-बुक करता येणार आहे. Flipkart Big Billlion Days सेल दरम्यान प्री-बुकिंग ऑफर अंतर्गत Mi10T सीरिजच्या खरेदीवर 3 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. त्याचसोबत 2 हजार रुपयांचा एक्सजेंच बोनसचा सुद्धा लाभ घेता येणार आहे. तर फोन नो-कॉस्ट EMI वर सुद्धा खरेदी करता येणार आहे. (Amazon Great Indian Festival Sale 2020 मध्ये रेडमी आणि वनप्लस च्या 'या' स्मार्टफोन्स आकर्षक ऑफर्स; पहा किती आहे डिस्काऊंट)
Mi10T आणि Mi10T Pro स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम (Nano) कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. दोन्ही स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 10 बेस्ड MIUI12 वर आधारित आहेत. फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रेज्यॉल्यूशन 1080X400 पिक्सल असणार आहे.