Amazon Great Indian Festival Sale 2020 (Photo Credits: Amazon India)

येत्या काही दिवसांत अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) या मोठ्या ई-कॉमर्स वेबसाईटवर 2020 चा फेस्टिव्ह सेल संपूर्ण देशभरात सुरु होणार आहे. 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल' (Amazon Great Indian Festival Sale) अॅमेझॉनवर 17 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. अॅमेझॉन प्राईम मेंबर्संना या सेलचा लाभ 16 ऑक्टोबरपासून घेता येणार आहे. हा सेल जवळपास महिनाभर चालू असेल आणि ग्राहक सहा वेगवेगळ्या भाषेमध्ये या सेलचा आनंद घेऊ शकतील. या भाषांमध्ये हिंदी आणि इंग्रजी सोबत तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नडा या भाषांचा देखील समावेश आहे. या सेलअंतर्गत अॅमेझॉन एचडीएफसी बँकच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड धारकांना 10% इस्टंट कॅशबॅक मिळणार आहे. या सेल अंतर्गत OnePlus 8, Redmi 9A, Redmi Note 9 Pro यांसारख्या अनेक समार्टफोनवर आकर्षक ऑफर्स दिल्या जाणार आहेत. जाणून घेऊया काय आहेत ऑफर्स... (Flipkart Big Billion Days Sale 2020: फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल मध्ये Realme च्या 'या' जबरदस्त स्मार्टफोन्सवर मिळणार भन्नाट सूट)

Redmi 9A:

या सेलमध्ये रेडमी 9ए हा स्मार्टफोन केवळ 6499 रुपयांत ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.53 इंचाचा एचडी+डिस्प्ले देण्यात आला असून यामध्ये 13MP चा रिअर कॅमेरा तर 5MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ G25 प्रोसेसर असून 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. सेलपूर्वी या फोनची किंमत 8499 रुपये इतकी होती.

Redmi 9A First Online India Sale (Photo Credits: Amazon India)

Redmi Note 9 Pro:

या सेलमध्ये रेडमी नोट 9 प्रो या स्मार्टफोनवर तब्बल हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. हा फोन केवळ 12999 रुपयांना मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+डॉट डिस्प्ले देण्यात आला आहे. 46MP चा क्वार्ड रिअर कॅमेरा आणि 16MP चा सेल्फी शूटर देण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 720G चिपसेट देण्यात आला असून 5,020mAh ची बॅटरी 18W च्या फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आला आहे. रेडमी नोट 9 प्रो ची सेल पूर्वीची किंमत 13999 रुपये होती.

Redmi Note 9 Pro India Sale (Photo Credits: Amazon India)

OnePlus 8 5G:

वनप्लस 8 5 जी या स्मार्टफोनवर देखील 2000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. सेल दरम्यान या मोबाईलचा 6 जीबी वेरिएंट फक्त 39,999 रुपयांना उपलब्ध आहे. वनप्लस 8 5G चा 8GB+28GB हँडसेट 41,999 रुपयांना तर 12 GB+256GB हँडसेट 44999 रुपयांना मिळत आहे. या मोबाईलमध्ये 48MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला असून 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 4,300mAh ची बॅटरी 30W च्या वॉर्प वायरलेस चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.

OnePlus 8T Prices Leaked Ahead of Launch (Photo Credits: OnLeaks)

या ऑफरसोबतच Samsung's Serif TV  चे 43, 49 आणि 55 इंच वेरिएंट मॉडल्स अनुक्रमे  64,990, 84,990 आणि 99,990 रुपयांना मिळत आहे. त्याचप्रमाणे रेडमी स्मार्टबँडवर 300 रुपये डिस्काऊंट दिला असून तो सेल अंतर्गत 1,299 रुपयांना उपलब्ध आहे. तसंच  Honor MagicWatch 2 हे 9,999 रुपयांना मिळेल.