Flipkart Big Billion Days Sale 2020: फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल मध्ये Realme च्या 'या' जबरदस्त स्मार्टफोन्सवर मिळणार भन्नाट सूट
Best deals on Realme Phones in Flipkart Big Billion Days Sale 2020 (Photo Credits: Twitter)

संपूर्ण भारतवासिय ज्या ऑनलाईन सेलची (Online Sale) आतुरतेने वाट पाहत आहे तो सेल अवघ्या 2 दिवसात सुरु होणार आहे. ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) 'बिग बिलियन डेज सेल' (Big Billion Days Sale) येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. 16 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान असणा-या या सेलमध्ये One Plus, Realme, Vivo सारख्या ब्रँडसच्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट मिळणार आहे. यात गेल्या काही वर्षात भारतात चांगलाच जम बसवलेली कंपनी रियलमी चे दमदार स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे.

यंदा कोरोना व्हायरसमुळे लोकांचे घराबाहेर थोडे मुश्किलच असल्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा जास्त ग्राहक या ऑनलाईन शॉपिंगचा फायदा घेतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फ्लिपकार्टच्या या बिग बिलियन डेज सेलमध्ये SBI च्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारकांना त्वरित 10% चा डिस्काउंट मिळणार आहे. Flipkart Big Billion Days Sale 2020: बिग बिलियन डे सेल पूर्वीच ग्राहकांना अवघ्या एक रूपयामध्ये वस्तू Pre-Book करता येणार; इथे जाणून घ्या या धमाकेदार ऑफर्स बद्दल!

पाहूयात Realme च्या कोणत्या दमदार स्मार्टफोन्सवर या सेलमध्ये मिळतेय जबरदस्त ऑफर:

1. Realme narzo 20 Pro

मूळ किंमत- 16,999 रुपये

ऑफर किंमत- 14,999 रुपये

स्टोरेज- 64GB

2. Realme C11

मूळ किंमत- 8,999 रुपये

ऑफर किंमत- 6,499 रुपये

स्टोरेज- 32GB

हेदेखील वाचा- Flipkart Big Billion Days, Amazon Great Indian Festival: TV खरेदी करायचा आहे? फ्लिपकार्ट, अॅमेझोन सेलमध्ये आहे संधी, पाहा पर्याय

3. Realme 7 Pro

मूळ किंमत- 20,999 रुपये

ऑफर किंमत- 19,999 रुपये

स्टोरेज- 128 GB

4. Realme X3 SuperZoom

मूळ किंमत- 29,999 रुपये

ऑफर किंमत- 24,999 रुपये

स्टोरेज- 256 GB

5. Realme C12

मूळ किंमत- 10,999 रुपये

ऑफर किंमत- 7,999 रुपये

स्टोरेज- 32 GB

6. Realme X50 Pro

मूळ किंमत- 41,999 रुपये

ऑफर किंमत- 36,999 रुपये

स्टोरेज- 128 GB

रियलमी च्या स्मार्टफोन्ससह अनेक गॅजेट्सवरही या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल मध्ये जबरदस्त सूट मिळत आहे. या सेलमध्ये 250 मिलियन ग्राहकांसाठी विविध प्रोडक्ट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सुमारे 40-50 मिलियन शॉपर्स ऑनलाईन येणार आहेत. त्यामुळे घरात राहूनही सणांसाठी ऑनलाईन शॉपिंग करायला काही हरकत नाही.