Mi कंपनी घेऊन येणार मेड इन इंडिया QLED 4K स्मार्ट टिव्ही, जाणून घ्या किंमतीसह खासियत
प्रतिकात्मक फोटो | (Archived, edited, representative images)

शाओमी (Xiaomi)  कडून भारतात एक नवा स्मार्ट टिव्ही लॉन्च करण्याची तयारी करण्यात येत आहे. हा एक मेड इन इंडियाा QLED स्मार्ट टिव्ही असणार आहे. या अपकमिंग Mi QLED TV 4K स्मार्ट टिव्ही येत्या 16 डिसेंबरला लॉन्च केला जाणार आहे. भारतात LG, Samsung आणि Sony सारक्या कंपन्या सध्याच्या काळात प्रीमियम QLED स्मार्ट टीव्ही उतरवत आहेत. दरम्यान या स्मार्ट टिव्हीची किंमत अधिक आहे. अशातच आता शाओमी कडून शिखाला परवडणारा एक स्मार्ट टिव्ही लॉन्चिंग केला जाणार आहे. या टिव्हीची थेट टक्कर Smsung, Sony आणि LG कंपन्यांसोबत होणार आहे.(भारतात प्रथमच लॅपटॉप चार्जिंग पॉवरबँक लॉन्च, जाणून घ्या खासियत) 

Xiaomi च्या अपकमिंग QLED स्मार्ट टिव्ही मध्ये डॉल्बी विजन, HDR10+, डॉल्बी ऑडिओ, अॅन्ड्रॉइड टिव्ही ओएस बेस्ड पॅचवॉल UI, डुअल बँन्ड Wi-Fi सपोर्ट आणि Mi क्विक वेक सारखे फिचर्स मिळणार आहेत. त्याचसोबत या स्मार्ट टिव्हीमध्ये 100 टक्के कलर वॉल्यूम ऑफर ही दिली जाणार आहे. यामध्ये Quantum Dot स्क्रिन दिली जाणार आहे. त्याचसोबत स्मार्ट टिव्हीमध्ये HDMI 2.1, eARC, ALLM आणि AV1 सपोर्ट मिळणार आहे.(WhatsApp Carts Feature मुळे आता व्हॉट्सअ‍ॅप वर शॉपिंगचा अनुभव होणार अधिक सुकर; पहा कसं वापराल हे फीचर)

या डिवाइसमध्ये 1.9GHz Amlogic क्वाड कोर प्रोसेसर ही दिला जाणार आहे. तसेच Mali-G31 MP2 जीपीयू दिला आहे. Mi QLED TV 4K डिवाइस Patchwall OS वर काम करणार आहे. ही ऑपरेटिंग सिस्टिम खासकरुन भारतीय ग्राहकांसाठीच तयार केली आहे. यामध्ये 23 कन्टेंट पार्टनर जसे Netflix, Prime Video, Hotstar ची सुविधा दिली जाणार आहे. त्याचसोबत 16 भाषांमध्ये आणि 20 युनिक फिचर्स ही ग्राहकांना मिळणार आहेत.