सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोन (Photo Credit-Twitter)

कोरियन कंपनी Samsung चा फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच लॉन्च करेल. या स्मार्टफोनचे नाव Galaxy F असू शकते. F चा अर्थ आहे Fold. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये दोन वेगवेगळ्या बॅटऱ्या असतील. या दोन्ही बॅटऱ्यांची कॅपेसिटी 6,000 mAh इतकी असेल. साधारणपणे या कॅपेसिटीची बॅटरी Samsung च्या टॅबलेटमध्ये असते. फोल्डेबल स्मार्टफोनमधील दोन वेगवेगळ्या बॅटऱ्या दोन वेगवेगळ्या डिस्प्लेला पावर देतील. फोटोग्राफीसाठी फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये रिअर पॅनलवर ड्यूल कॅमेरा सेटअप असेल. या स्मार्टफोनमध्ये मागे दोन कॅमेरे असतील. हे दोन्ही कॅमेरे 12-12 मेगापिक्सलचे असतील. तर फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा असेल.

CGS-CIMB रिसर्च एनालिस्टनुसार, सॅमसंगच्या या फोल्डेबल फोनमध्ये Exynos 9820 किंवा क्वॉलकॉम 855 प्रोसेसरसोबत 8GB रॅम असेल. त्याचबरोबर या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये एकाहून अधिक स्टोरेजचे पर्याय असतील.

हा फोल्डेबल स्मार्टफोन सुमारे 1,800 डॉलर म्हणजे सुमारे 1,30,000 रुपयांचा असेल. या स्मार्टफोनची मेटेरिअरल कॉस्ट 636.70 डॉलर म्हणजे सुमारे 46,000 रुपये आहे. या फोल्डेबल स्मार्टफोनची स्क्रीन 7.3 इंच असेल. तर याचे रिजोल्यूशन 1536x2152 पिक्सल असेल.

Galaxy Foldable smartphone अॅनरॉईड 9 Pie वर आधारित असेल. हा फोन नव्या OneUI इंटरफेस सहीत मिळेल. त्याचबरोबर कंपनी 20 फेब्रुवारीला Galaxy S10 हा स्मार्टफोन लॉन्च करत आहे. तर हा फोल्डेबल स्मार्टफोन (Galaxy Fold) मार्च किंवा एप्रिलमध्ये लॉन्च होईल.