Mark Zuckerberg : मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी आरोप केला की, जागतिक महामारी कोविड-19 च्या काळात संबंधित सामग्री सेन्सॉर करण्यासाठी फेसबुकवर यूएस सरकारने दबाव टाकला होता. त्यावर आता मार्क झुकरबर्ग यांनी मत व्यक्त केलं आहे. त्यांनी जनतेची माफी मागितली आहे.
“2021 मध्ये, जो बिडेन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यसंघांवर विनोदी आणि व्यंग्यांसह काही COVID-19 सामग्री प्रसारीत करण्यासाठी वारंवार दबाव टाकला,” असे मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी झुकरबर्ग यांनी यूएसच्या न्यायपालिकेच्या समितीला लिहिलेल्या पत्रात लिहिले. सामग्री काढायची की नाही हा मेटाचा निर्णय असताना, "सरकारी दबाव चुकीचा होता आणि मला खेद आहे की आम्ही त्याबद्दल अधिक स्पष्टपणे बोललो नाही." असे देखील ते पुठे म्हणाले.
जो बिडेन यांचा दबाव
#Meta CEO Says He was ‘pressured’ by Biden to pull #COVID content, & that he regrets the company’s decision to accede to the demands#MarkZuckerberg #BidenHarris2024 pic.twitter.com/m9xu5Cpt10
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) August 27, 2024
प्रशासनाच्या कोणत्याही दबावामुळे मेटाने आपल्या सामग्रीच्या मानकांशी तडजोड करू नये असे मला वाटते, असे झुकरबर्ग म्हणाले. 'पुन्हा असे काही घडल्यास आम्ही मागे हटणार नाही,'असे ते म्हणाले.