Jio च्या Postpaid Plus सेवेबद्दल येथे अधिक जाणून घ्या, युजर्सला मिळणार 'या' सुविधा
Mukesh Ambani | Reliance Jio | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

रिलायन्सच्या 42 व्या AGM इवेंटमध्ये सर्व लक्ष जियो फायबर सर्विसवर केंद्रित करण्यात आले होते. यामध्ये ब्रॉडब्रँन्ड सर्विस, सेट अप बॉक्स आणि लॅन्डलाइन कनेक्शन हे महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले होते. दरम्यान या इवेंटवेळी जिओच्या पोस्टपेड प्लस (Jio Postpaid Plus) बद्दल सुद्धा घोषणा करण्यात आली. जिओच्या या नव्या सेवेच्या माध्यमातून आता युजर्सला विविध सुविधा मिळणार आहेत. मात्र कंपनीकडून अद्याप याबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

कोणासाठी आहे जिओ पोस्टपेड प्लस?

रिलायन्स AGM इवेंटमध्ये मुकेश अंबानी यांनी सांगितले की, पोस्टपेड प्लस ही सुविधा प्लॅटिनम ग्रेड सर्विस आणि प्रोडक्ड संबंधित अनुभवणाऱ्या युजर्ससाठी फार महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे जे युजर्स जियोफायबर सर्विस वापरणार आहेत त्यांना जिओ पोस्टपेड प्लस सर्विस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

युजर्सला कोणत्या सुविधा आणि ऑफर्स मिळणार?

-पोस्टपेड प्लस सर्विस ही एक प्रिमिअम सर्विस असून याचा उपयोग जिओ युजर्सला करता येणार आहे. येथे 'प्लस' हा शब्द वॅल्यू अॅडेड बेनिफिट्ससाठी वापरण्यात आला आहे.

-जियो पोस्टपेड प्लस सर्विसच्या माध्यमातून सर्व डिवाइससाठी कनेक्शन मिळणार आहे.

-खासकरुन घरातील अन्य मंडळींसोबत जिओ पोस्टपेड प्लस सेवा शेअर करु शकता.

-त्याचसोबत इंटरनॅशनल रोमिंगचा फायदा या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांना घेता येणार आहे.

-प्लस सेवा धारकांना जिओचा नवा फोन घेतल्यास त्यावर अन्य ऑफर्स देण्यात येणार आहेत.

-पोस्टपेड प्लसच्या माध्यमातून सर्व प्रकारचे बिल एकत्र येणार आहेत.(RIL AGM: Jio Giga Fiber सोबत HD TV फ्री ;Jio Phone 3 लॉन्चिंगसाठी तयार; मुकेश अंबानी यांनी दिली माहिती, जाणून घ्या अधिक)

तर वरील सुविधा आणि ऑफर्स जिओ पोस्टपेड प्लस युजर्सला देण्यात येणार आहेत. तसेच जिओने असे सांगितले आहे की, ही सुविधा ग्राहकांसाठी 5 सप्टेंबर पासून सुरु करण्यात येणार आहे. तर या सुविधेबद्दल अधिक माहिती युजर्सला त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळणार आहे.