Mukesh Ambani | Reliance Jio | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

दूरसंचार (Telecommunication)  क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी जिओ (Jio)  नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक भन्नाट ऑफर्स आणत असते. त्याचप्रमाणे आताही, आतापासून जिओ आपल्या 198 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) मधून वापरकर्त्यांना फायदा घडवून देणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना नेहमीप्रमाणे अमर्याद कॉल करता येतील तर आतपर्यंत दिवसाला मिळणाऱ्या 1.5 जीबी डेटाऐवजी आता 2  जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. या डेटासह अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि प्रतिदिन 100 एसएमएस दिला जाणार आहे. या सर्व प्लॅन्स सोबत जिओचे सर्व अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा ग्राहकांना मिळणार आहे.

जिओच्या ग्राहकांनी 449 रुपयांचा रिचार्ज केल्यास त्यांना तीन महिन्यांपर्यंत जिओची सेवा मिळणार आहे. या प्लानची वैधता 91 दिवसांची आहे. तीन महिन्यात ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा म्हणजेच 136.5 जीबी डेटा मिळू शकणार आहे. तसेच दररोज १०० एसएमएस फ्री मिळणार आहे. जबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेला Oppo F11 Pro चा वॉटर ग्रे वेरियंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये

जिओ कंपनीचे सीम लाँच झाल्यापासून भारतातील दूरसंचार क्षेत्रात अनेक महत्वपूर्ण बदल झाले आहेत. ४G नेट स्पीड पासून ते अमर्याद कॉलिंग पर्यंत जिओने दिलेल्या सुविधांशी बरोबरी करण्यासाठी बाजारातील अन्य कंपन्या देखील वेगवेगळे प्लॅन्स आणू लागल्या आहेत. मात्र यामध्ये ग्राहकांनाच फायदा होणार आहे हे निश्चित.