स्मार्टफोन कंपनी ओप्पो ने भारतात आपला स्मार्टफोन ओप्पो F11 प्रो (Oppo F11 Pro) चा वॉटर ग्रे वेरियंट भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 23, 990 रुपये इतकी असून हा अॅमेझॉनच्या प्राईम डे (Amazon Prime Day Sale) सेलवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. गेल्या ब-याच दिवसांपासून या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा होती. आपल्या आकर्षक फिचर्समुळे ओप्पो नेहमीच ग्राहकांची मने जिंकण्यास यशस्वी ठरला आहे. त्यामुळे ओप्पो चा हा नवीन स्मार्टफोन देखील खास वैशिष्ट्यांनी बनविण्यात आला आहे. मार्चमध्ये Oppo F11 Pro स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला होता.
जाणून घ्या या स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये:
या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून 1080x2340 रिझोल्युशन देण्यात आले आहे. त्याचबरोबर यात 6GB रॅम आणि 128GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच हा स्मार्टफोन मिडियाटेक हेलिओ P70 प्रोसेसर ने सुसज्ज आहे.
या स्मार्टफोनचे मुख्य आकर्षण म्हणजे यात 48 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि 16 मेगापिक्सेलचा ए वन पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
हेही वाचा- Oppo F11 Pro Avengers आज भारतात होणार लॉन्च; 'अॅमेझॉन' वर खरेदी करण्याची खास संधी
एकदा हा फोन चार्ज केल्यास 15 तास त्याची बॅटरी राहू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
हा स्मार्टफोन अॅमेझॉनच्या प्राईम डे सेलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. एचडीएफसी बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना १० टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे.