देशात 5जी (5G) लाँच करण्यात आले आहे. जिओ (Jio) आणि एअरटेल (Airtel) च्या 5जी सेवा देशात सुरू झाल्या आहेत. एअरटेलच्या 5जी सेवा सध्या देशातील 8 शहरांमध्ये आहेत, तर रिलायन्स जिओ चार शहरांमध्ये बीटा ट्रायल म्हणून 5जी ची चाचणी करत आहे. या शहरांमध्ये Android वापरकर्त्यांना 5जी नेटवर्क मिळू लागले आहे, परंतु आयफोन वापरकर्त्यांना यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आयफोन 12 (iPhone 12) आणि नंतरच्या सर्व आयफोन्समध्ये 5जी देण्यात आले आहे, परंतु अपडेटशिवाय आयफोन वापरकर्ते 5जी वापरू शकत नाहीत.
ऍपल (Apple) ने अद्याप आयफोनसाठीच्या 5जी अपडेटबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. ऍपलसोबतच काही सॅमसंग फोन युजर्सही 5जी अपडेटची वाट पाहत आहेत. एअरटेलने आपल्या साइटवर सर्व आयफोनची यादी जारी केली आहे ज्यांना 5जी साठी समर्थन मिळेल, परंतु ऍपलकडून अपडेट आल्यानंतरच या आयफोनवर 5जी सुरु होईल.
एका अहवालानुसार, ऍपल डिसेंबरपर्यंत 5जी अपडेट जारी करेल, त्यानंतरच वापरकर्ते आयफोनमध्ये 5जी वापरण्यास सक्षम असतील. अहवालात असेही म्हटले आहे की ऍपल प्रथम दिल्ली-मुंबईसारख्या मेट्रो शहरांसाठी 5जी अपडेट जारी करेल. असे म्हटले जात आहे की ऍपल जिओच्या नेटवर्कवर 5जी ची चाचणी करत आहे.
सॅमसंगने आपल्या निवेदनात म्हटले आहे की ते 2009 पासून 5जी तंत्रज्ञानावर काम करत आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस सर्व उपकरणांसाठी 5जी OTA अपडेट जारी करेल. गुगल पिक्सल (Google Pixel) स्मार्टफोनला लवकरच 5जी अपडेट मिळेल, त्यानंतरच वापरकर्ते 5जी वापरू शकतील. असे म्हटले जात आहे की गुगल देखील डिसेंबरपर्यंत अपडेट जारी करेल. ऍपल व्यतिरिक्त, सॅमसंग, मोटोरोला, Asus, Honor, Lava, LG, Nokia आणि Tecno फोनमध्ये देखील अपडेट आल्यानंतरच 5जी सुरु होईल. (हेही वाचा: 5G SIM Upgrade Fraud: आता 5जी सिम अपग्रेडच्या नावाखाली होत आहे मोठी फसवणूक; कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचे पोलिसांचे आवाहन)
आज म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी 5जी अपडेटबाबत दूरसंचार विभाग आणि मोबाईल कंपन्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत फोनसाठी 5जी अपडेटबाबत मोबाईल कंपन्यांवर दबाव आणला जाऊ शकतो आणि त्यांना अपडेट जारी करण्यासाठी एक निश्चित तारीख दिली जाऊ शकते. असे झाले तर लवकरच सर्व कंपन्यांच्या फोनमध्ये 5जी सुरु होईल.