iPhone 11 कॅमेऱ्याच्या लूकवरुन सोशल मीडियात नेटकऱ्यांकडून खिल्ली, पहा मजेशीर मिम्स
Funniest memes on iPhone 11 (Photo Credits: Twitter)

प्रत्येक वर्षी iPhone च्या नव्या मॉडेलच्या लॉन्चची चर्चा जगभरात सुरु असते. यंदा 2019 मध्ये आयाफोन कंपनीने तीन नवे आणि लेटेस्ट अपडेटेड फोन मंगळवारी (11 सप्टेंबर) लॉन्च केले आहेत. आयफोनची 11 वी सीरिज ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. यापूर्वी आयफोन खरेदी करण्यासाठी किडनीवरुन करण्यात आलेला जोक फारच प्रसिद्ध झाला होता. तसेच प्रत्येक वेळी आयफोनवरुन मीम्ससुद्धा बनवले जातात. पण आता ही iPhone 11 Pro च्या कॅमेऱ्याच्या लूकवरुन सोशल मीडियात खिल्ली उडवली जात आहे.

iPhone 11 Pro साठी तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. तर iPhone 11 साठी दोन रियर कॅमेरे आहेत. मात्र आयफोन 11 प्रो च्या कॅमेरा लूकवरुन त्याची सोशल मीडियात नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. या संदर्भातील मिम्स सुद्धा आता वेगाने व्हायरल होत आहेत.(Apple कंपनी तर्फे खास सोहळ्यात iPhone 11, iPhone 11 Pro, iPhone 11 Pro Max करण्यात आले लाँच; जाणून घ्या या किंमत व खासियत)

नोबल पुरस्कार विजेती मलाला हिने सुद्धा आयफोन 11 प्रो बाबत ट्वीट केले आहेत. या ट्वीटमध्ये तिने असे म्हटले आहे की, आयफोन 11 प्रोच्या लॉन्च वेळी कॅमेऱ्याच्या लूक सारखाच मी ड्रेस घातला होता.

रवी प्रजापती या ट्वीटर युजर्सने आयफोनच्या कॅमेऱ्याची तुलना नारळासोबत केली आहे.

एका युजर्सने आयफोनच्या या कॅमेऱ्याला स्पिनर सारखे दिसत असल्याचे फोटोच्या माध्यमातून दाखवले आहे.

iPhone 20 चे लूक असा असेल:

चेतन शर्मा याने कुक करण्यासाठी आयफोनच्या कॅमेऱ्याचा वापर शेफ लोकांसाठी उपयोगी पडणार असल्याते म्हटले आहे.

आयफोनच्या सोहळ्यात कंपनीद्वारे अ‍ॅपल टीव्ही प्लस एकाच वेळी शंभर देशांमध्ये लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या टीव्हीमध्ये अनेक ओरिजनल टीव्ही शो प्रसारीत होणार असून आयफोन 11 सोबतच या टीव्हीचे एका वर्षाचे सब्सक्रिप्शन मोफत मिळणार असल्याचे सांगितले

आहे.