Internet Speed चा विश्वविक्रम; अवघ्या 1 सेकंदात 1000 पेक्षा जास्त HD फिल्म्स झाल्या डाऊनलोड, जाणून घ्या काय आहे स्पीड
इंटरनेट | प्रातिनिधिक प्रतिमा | (संग्रहित संपादित प्रतिमा)

एक मोठा विक्रम करत, ऑस्ट्रेलियामधील संशोधकांनी (Australian Researchers) जगातील सर्वात जास्त इंटरनेट स्पीड (World Highest Internet Speed) प्राप्त केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मोनाश, स्वाइनबर्न आणि आरएमआयटी (Monash, Swinburne, and RMIT) विद्यापीठांमधील संशोधकांनी, जगातील सर्वात वेगवान इंटरनेट डेटा स्पीडची यशस्वीपणे चाचणी घेऊन रेकॉर्ड केला आहे. हा वेग Tbps म्हणजेच तो टेराबाइट प्रति सेकंद आहे. हा इंटरनेट वेग इतका जास्त आहे की केवळ 1 मिनिटात 42 हजार जीबीहून अधिक डेटा डाउनलोड केला जाऊ शकतो. Tbps मध्ये संशोधकांना प्राप्त झालेल्या या वेगामध्ये एका टेराबाईटमध्ये 1000 अब्ज युनिट डिजिटल माहिती आहे.

सोप्या शब्दात सांगायचे तर 1 मेगाबाईटमध्ये 1 लाख  युनिट डिजिटल माहिती असते. एक चांगला ब्रॉडबँड कनेक्शन 100 Mbpsचा वेग प्रदान करतो, ज्यात सेकंदात 100MB डेटा प्राप्त होतो. मोबाइल डेटा किंवा वायरलेस कनेक्शनमध्ये ही गती 1 Mbps पेक्षा कमी असतो. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, असा हा नवीन विश्वविक्रम 44.2 टीबीपीएस वेगाचा झाला आहे. टेराबाइट प्रति सेकंद इंटरनेटच्या वेगामध्ये 1000GB डेटा फक्त एका सेकंदात डाउनलोड केला जाऊ शकतो. याचा अर्थ असा की, संशोधकांनी एका सेकंदात 44,200 जीबी डेटा डाउनलोड केला आहे. या स्पीडच्या इंटरनेटमुळे, 512 जीबी स्टोरेज असलेले 86 पेक्षा जास्त स्मार्टफोन आणि 256 जीबी स्टोरेज असलेले 172 पेक्षा जास्त स्मार्टफोनचे स्टोरेज या भरले जाऊ शकते. हे करण्यासाठी फक्त एक सेकंद लागेल.

ब्रिटनमधील सरासरी ब्रॉडबँड वेग प्रति सेकंद 64 मेगाबाइट आहे.आता ऑस्ट्रेलियामधील संशोधकांनी मायक्रो-कॉम्ब नावाच्या एका सिंगल चिपच्या मदतीने हा विक्रम तयार केला आहे. हा चीप सध्याच्या विद्यमान टेलिकॉम हार्डवेअरच्या 80 थरांच्या जागी फक्त एका लहान चिपची जागा घेतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, त्याच्या मदतीने होम-वर्किंग, स्ट्रीमिंग आणि सोशलायजिंगची मागणी वाढविली जाईल. त्याशिवाय नवीन तंत्रज्ञानयुक्त सेल्फ-ड्रायविंग कार्स, औषध आणि शिक्षण क्षेत्रांमध्येही याची मदत होईल.