स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix चा उद्या म्हणजेच 9 ऑगस्टला ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर Infinix Hot 9 Pro स्मार्टफोनचा सेल ठेवण्यात आला आहे. हा सेल उद्या दुपारी 12 वाजता सुरु होईल. या स्मार्टफोनची किंमत 10,499 रुपये इतकी आहे. फ्लिपकार्ट (Flipkart) ठेवण्यात आलेल्या या सेलमध्ये हा स्मार्टफोन 2500 रुपयांच्या डिस्काऊंटसह उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर (Flipkart Axis Bank Credit Cards) खरेदी केल्यास 5% अनलिमिडेट कॅशबॅकचा पर्याय उपलब्ध आहे. तर अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड (Axis Bank Buzz Credit Cards) आणि एसबीआय क्रेडिट कार्डवर (SBI Credit Cards) 5 % चा डिस्काऊंट दिला जात आहे. तर नो कॉस्ट ईएमआय (No-Cost EMI) तसंच स्डँटर्ड ईएमआयचा (Standard EMI) पर्याय दिला जात आहे.
Infinix Hot 9 Pro या स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 6.6 इंचाचा एचडी+पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिजोल्यूशन 1600x720 इतके आहे. तर फोटोग्राफीसाठी यात क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48MP चा मेन कॅमेरा असून 2MP चा मॉक्रो लेन्स, 2MPचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसंच यात लो लाईट सेन्सर आणि ट्रिपल LED फ्लॅश आहे. WhatsApp युजर्सला Picture In Picture मोडमध्ये पाहता येणार ShareChat व्हिडिओ
यात 8MP चा AI शूटर कॅमेरा असून त्यात AI 3D फेस ब्युटी मोड सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio P22 SoC प्रोसेसर असून 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. इंटरनल मेमरी तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 256GB पर्यंत वाढवण्यात येईल.
या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी असून 10W चा चार्जर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अॅनरॉईड 10 वरील XOS 6.0 या ऑपरेटिंग स्टिटमवर काम करतो. कनेक्टीव्हीटीसाठी यात ब्लूट्युथ v5, 3.5mm audio jack, FM Radio, USB OTG, VoWiFi & a micro USB पोर्ट देण्यात आला आहे. या फोनच्या 4GB आणि 64GB या कॉन्फिग्रेशनची किंमत फ्लिपकार्टवर 10,499 रुपये इतकी आहे.