भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या कामगार, मजूर वर्गाला आपल्या घरी पोहचवण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दीड लाखांहून अधिक कागारांनी याचा फायदा घेतला आहे. मात्र रविवारी रेल्वे प्रशासनाने येत्या 12 एप्रिल पासून पॅसेंजर ट्रेन सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी प्रवाशांना ऑनलाईन पद्धतीने तिकिट बुकिंग करण्यास सांगितले आहे. परंतु रेल्वे स्थानकातील तिकिट खिडकी बंद राहणार असल्याचे ही स्पष्ट केले आहे. याच दरम्यान आता भारतीय रेल्वे प्रशासनाकडून उद्यापासून (12 मे) सुरु होणाऱ्या 30 विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
काही वेळापूर्वी नागरिकांकडून भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाईट आयआरसीटीसी येथे तिकिट बुकिंग करण्यास सुरुवात केली होती. परंतु नागरिकांना तिकिट बुकिंग करण्यासाठी अडथळा येत असल्याने नाराजगी व्यक्त करण्यात आली होती. मात्र आयआरसीटीसीने संध्याकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा रेल्वे तिकिट बुकिंग ऑनलाईन पद्धतीने सुरु होणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानंतर आता 30 विषेश गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करुन कोणती ट्रेन कधी असणार आणि त्याची वेळ सुद्धा सांगितली आहे.
Indian Railways issues the timings of 30 special trains to be run with effect from 12th May. pic.twitter.com/fvwxMrL3P3
— ANI (@ANI) May 11, 2020
दरम्यान, भारतीय रेल्वेने असे म्हटले होते की. सुरुवातीला सर्व 15 राजधानी ट्रेनच्या मार्गांवर वातानुकुलित सेवा सुरु होणार आहेत. परंतु त्याचे भाडे सुपर फास्ट ट्रेनच्या समान असणार आहे. या विशेष गाड्या नवी दिल्ली येथून सुटणार आहेत. त्याचसोबत डिब्रुगढ, अगरताला, हावडा, पटना, बिलासापुर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरु, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगांव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू-तवी पर्यंत चालवण्यात येणार आहे.