IRCTC Website Shut (Photo Credits: File Photo)

भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाईट इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन- irctc.co.in ठप्प झाली आहे. कारण रेल्वे मंत्रालयाने नागरिकांना येत्या 12 मे पासून 15 पॅसेंजर ट्रेन सुरु होणार असल्याची घोषणा केल्यावर आयआरसीटीच्या वेबसाईट्सवर रेल्वे तिकिट बुकिंग ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आले होते. परंतु नागरिकांकडून तिकिट बुकिंग करण्याचा प्रयत्न केला जात असून तिकिट बुक होत नसल्याने ट्वीटरवर त्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर 15 पॅसेंजर ट्रेनसाठी 4 वाजल्यापासून तिकिट बुकिंग सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आता 6 वाजता सुविधा पुन्हा सुरु होणार असल्याचे आयआरसीटीसी कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सोशल मीडियात बहुतांश लोकांनी आयआरसीटीसीची वेबसाईट सुरु होत नाही आहे आणि बुकिंग सुद्धा बंद केल्याचे दाखवत नसल्याचा स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. नॅशनल कॉन्फ्रेंस लीडर आणि माजी जम्मू-कश्मीर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी असे म्हटले आहे की, आयआरसीटीसीची वेबसाईट क्रॅश झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती. मी याबाबत माझ्या मित्राकडून ऐकल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले असून तो सुद्धा आयआरसीटीच्या वेबसाईटवरुन तिकिट बुकिंग करत होता. ज्या वेबसाईटवर नागरिकांची गर्दी तिकिट बुकिंगसाठी सुद्धा सांभाळता येत नाही तर तिकिट विक्री रोखण्यात काय अर्थ आहे असे ही ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.(E-Catering, चादर, ब्लॅंकेट शिवाय सुरू होणार 12 मे पासून भारतात प्रवासी रेल्वे सेवा; Aarogya Setu App वापरा: रेल्वे मंत्रालयाच्या प्रवाशांना सूचना)

याप्रकरणी रेल्वे मंत्रालयाने स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, तिकिटांचे बुकिंग 6 वाजता सुरु होणार आहे. यापूर्वी रेल्वे प्रशासनाने नागरिकांसाठी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली होती. रविवारी रेल्वे मंत्रालयाने असे म्हटले होते की, 15 पॅसेंजर एसी कोचसह गाड्या सोडण्यात येणार असून लिमिटेड स्थानकात थांबणार आहेत. 12 मे पासून नवी दिल्ली येथून रेल्वे सुटणार असून मार्यादित स्थानकात थांबणार आहेत. परंतु रेल्वे स्थानकात तिकिट खिडकी मात्र बंद राहणार असल्याचे ही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.