India Ranks 1st in Digital Payments: डिजिटल पेमेंटमध्ये भारत जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर; 2022 मध्ये 89.5 दशलक्ष व्यवहारांची नोंद
Digital Payments Representative image (Photo Credit: pexels.com)

India Ranks 1st in Digital Payments: डिजिटल पेमेंटमध्ये (Digital Payments) भारत जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर आहे. MyGovIndia च्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये 89.5 दशलक्ष डिजिटल व्यवहारांसह भारत डिजिटल पेमेंटमध्ये पाच देशांच्या यादीत अव्वल आहे. आकडेवारीनुसार, 2022 मध्ये जागतिक रीअल-टाइम पेमेंटमध्ये भारताचा वाटा 46 टक्के होता, भारतातील डिजिटल पेमेंट व्यवहार इतर चार आघाडीच्या देशांच्या एकत्रित तुलनेत जास्त आहेत.

यासंदर्भात माहिती देताना MyGovIndia ने ट्विट केलं की, "डिजिटल पेमेंट लँडस्केपमध्ये भारताचे वर्चस्व कायम आहे. नाविन्यपूर्ण उपाययोजना आखून आम्ही कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. #9YearsOfTechForGrowth #9YearsOfSeva@GoI_MeitY@AshwiniVaishnaw@Rajeev_GoI@alkesh12sharma @_DigitalIndia," (हेही वाचा - UPI System: यूपीआय प्रणालीच्या सुविधेसाठी भारत आणि New Zealand  वाढवणार परस्परांतील सहकार्य)

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे, ज्याने 29.2 दशलक्ष व्यवहार केले आणि त्यानंतर चीन 17.6 दशलक्ष व्यवहारांसह आहे. चौथ्या क्रमांकावर 16.5 दशलक्ष डिजिटल व्यवहारांसह थायलंड आहे आणि त्यानंतर दक्षिण कोरिया 8 दशलक्ष व्यवहारांसह आहे, असे MyGovIndia च्या डेटाने नमूद केले आहे.

MyGovIndia हे भारत सरकारचे एक नागरिक सहभागाचे व्यासपीठ आहे, जे लोकांना त्यांच्या कल्पना आणि तळागाळातील योगदानासह सुराज्यासाठी काम करण्याची संधी देते. या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत डिजिटल पेमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. भारत अशा देशांपैकी एक आहे जिथे मोबाईल डेटा सर्वात स्वस्त आहे. आज देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था बदलत आहे.

डिजिटल पेमेंटमध्ये, मूल्य आणि व्हॉल्यूम या दोन्ही बाबतीत भारत नवीन टप्प्यावर आहे. जे RBI तज्ञांच्या मते भारताच्या पेमेंट इकोसिस्टमची मजबूती आणि स्वीकृती दर्शवते.