प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: New York Post)

एखाद्या अनोख्या ठिकाणी खासकरुन शहरात गुगल मॅप वापरणे अधिक फायदेशीर ठरत. कारण तुम्हाला याच्या माध्यमातून योग्य ठिकाणापर्यंत पोहचण्यास मदत होते. ऐवढेच नव्हे तर गुगल मॅपच्या (Google Map) माध्यमातून तुम्ही तुमचा एखादा मित्र किंवा घरातील एखाद्याला ट्रॅक करु शकता. यासाठी फक्त काही मिनिटे लागतात. काहीजण सध्या गुगल मॅपवरुन आपले लाइव्ह लोकेशन (Live Location) अगदी सहज व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एकमेकांसोबत शेअर करतता. हे अॅप आयफोन आणि अॅन्ड्रॉइड अशा दोन्ही युजर्ससाठी गुगलकडून उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

परंतु जर तुम्हाला घरबसल्या एखाद्याला ट्रॅक करायचे असेल तर कसे कराल? याबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्प्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.(Mobile Subscriber: डिसेंबरमध्ये मोबाईल ग्राहकांची संख्या 12.8 करोडाने कमी, एकट्या Jio ने 12.9 करोड ग्राहक गमावले, Airte आणि BSNL ग्राहक वाढले)

>>iPhone आणि iPad वर कसे पाठवाल तुमचे लोकेशन

-जर तुम्हाला तुमचे लाइव्ह लोकेशन एखाद्याला पाठवायचे असेल तर त्याच्याकडे प्रथम गुगलचे अकाउंट असावे. त्यानंतर गुगल Contact मध्ये Gmail अॅड्रेस असावा.

-आता डिवाइसवर गुगल मॅप सुरु करावा लागेल. त्यानंतर प्रोफाइल फोटोवर टॅप करावे. आता त्या व्यक्तीसोबत लोकेशन शेअर करता येईल.

-ज्या व्यक्तीला लोकेशन पाठवायचे आहे त्याची निवड करा. त्यानंतर एकाहून अधिक लोकांना सुद्धा तुम्हाला तुमचे लाइव्ह लोकेशन पाठवता येईल.

-आता तुम्हाला गुगल मॅपला कॉन्टॅक्टसह लोकेशन शेअर करण्याची परवानी स्विकारावी लागेल.

तसेच अॅन्ड्रॉइड युजर्सला सुद्धा याच पद्धतीने गुगल मॅपच्या माध्यमातून एखाद्याला ट्रॅक करु शकता. तर गुगल कडून युजर्ससाठी प्रत्येकवेळी नवे अपडेट सुद्धा आणले जातात. तसेच युजरला आपल्या सुविधांचा अधिकाधिक फायदा कसा घेता येईल या बद्दल ही गुगलकडून विचार केला जातो.