Google कडून क्रोम युजर्सला सिक्युरिटी संदर्भात अलर्ट जाहीर
Google Chrome Browser (Photo Credits-Twitter)

जगभरात इंटरनेटवर एखाद्या गोष्टीसंदर्भात सर्च करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गुगलने (Google) क्रोम युजर्सासाठी (Chrome Users) सिक्युरिटी संदर्भात एक अलर्ट सुचना जाहीर केली आहे. कंपनीने एक क्रोम अपडेट सुद्धा रोलआउट केले आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, अपडेट मध्ये सिक्युरिटी निश्चित केली आहे. गुगल क्रोम ब्राउजर वर्जन 81.0.404.113 हे विंडोज, मॅक आणि लिनक्ससाठी रोलआउट केले आहे. नवे अपडेट सिक्युरिटी निश्चित आणि रिवॉर्डसह आले आहे. कंपनीने या संदर्भात अधिक माहिती दिली नाही आहे. मात्र गुगलने एका लहानश्या नोट मध्ये असे म्हटले आहे की, बग डिटेल्स आणि लिंक तोपर्यंत नाही सांगितले जाणार जो पर्यंत अधिकतर युजर्सला सिक्युरिटी निश्चित करण्याचे अपडेट मिळत नाही.

गुगलने त्यांच्या ब्लॉक पोस्ट मध्ये असे सांगितले आहे की, येत्या काही दिवसात नवे अपडेट लॉन्च केले जाणार आहे. क्रोम ब्राउजर युजर्सला सर्वात वरील बाजूस डाव्या हाताला असणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करुन कोणते वर्जन आहे ते तपासून पाहता येणार आहे. त्यासाठी Help>>About येथे जावे लागणार आहे. याच महिन्यात गुगलने क्रोम 81 वर्जन जाहीर केले होते. त्यामध्ये Tab Group हे फिचर देण्यात आले होते. नावावरुनच असे समजते की, एकत्र टॅब क्लब केले जाऊ शकतात. यासाठी युजर्सला एका टॅबवर डबल क्लिक किंवा राइट क्लिक करुन Add to new group>>drag tabs into that group सिलेक्ट करावे लागणार आहे.(WhatsApp वर लवकरच येणार दोन नवे फिचर्स, लॉकडाउनच्या काळात ठरतील मजेशीर)

तर अपेडटसह युजर्सला ग्रुपचे हेडर, ग्रुमचे नाव कस्टमाइज करता येणार आहे. युजर्सला त्यांच्या मर्जी नुसार दोन ग्रुप एकत्र किंवा वेगळे करता येणार आहेत. या महिन्यापासून गुगलने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर SmeSite कुकी बदल तात्पुरते परत घेतले आहेत.