WhatsApp वर लवकरच येणार दोन नवे फिचर्स, लॉकडाउनच्या काळात ठरतील मजेशीर
WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

सोशल मीडियावरील जगप्रसिद्ध व्हॉट्सअॅप (WhatsApp) त्यांच्या युजर्ससाठी बदलत्या ट्रेन्डनुसार नवे फिचर्स आणतात. तर आता व्हॉट्सअॅप लवरच दोन नवे फिचर्स आणणार असून सध्याच्या लॉकडाउनच्या दरम्यान युजर्ससाठी फायदेशीर आणि मजेशीर ठरणार आहेत. व्हिडिओ क्रॉन्फ्रेंसिंगसाठी Zoom वेगाने जगभरात प्रसिद्ध होत आहे. मात्र सध्या झुम अॅपच्या सिक्युरिटीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याच पार्श्वभुमीवर आता व्हॉट्सअॅप सुद्धा ग्रुप व्हिडिओ कॉलिंगसाठी अधिक जणांना एकत्र आणण्यासाठी काम करत आहे. सध्या व्हॉट्सअॅपवर एकसाथ चारच व्यक्ती व्हिडिओ कॉलिंगवर बोलू शकतात.

Android साठी जारी करण्यात आलेल्या WhatsApp Beta यांच्याकडून अशी हिंट मिळाली आहे की, कंपनी ग्रुप व्हिडिओ कॉल्ससाठी मर्यादा वाढवणार असल्याची शक्यता आहे. तर झुम किंवा गुगल डुओ यांच्यामाध्यमातून अधिक जणांसोबत व्हिडिओ कॉलिंवर बोलू शकता येते. सोशल डिस्टंन्सिंगच्या काळात व्हिडिओ कॉलिंग फार महत्वाचे ठरत आहे. WABetainfo यांच्या रिपोर्टनुसार, अॅन्ड्रॉइडसाठी जारी करण्यात आलेल्या WhatsApp v2.20.128 बीटामध्ये अधिक जणांना ग्रुप व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे. कंपनीने सध्या हे फिचर्स युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले नाही आहे.(Lockdown मुळे लोकप्रिय ठरलेल्या Zoom App च्या युजर्सचा डेटा हॅक; पाच लाखाहून अधिक लोकांची माहिती गेली चोरीला)

दरम्यान, व्हॉट्सअॅपने ग्रुप कॉलिंग इंटरफेसमध्ये काही बदल केले आहेत. ग्रुप व्हिडिओ कॉलिंगसाठी एक डेडिकेटेड बटण दिले असून तुम्हाला ग्रुप मधील अन्य जणांसोबत जोडले जाता येणार आहे. यासाठी सर्व युजर्सकडे व्हॉट्सअॅपचे अपडेटेड वर्जन असणे अत्यावश्यक आहे.दुसऱ्या फिचर बाबत बोलायचे झाल्यास Android v2.20.129 वर्जनमध्ये एक नवे कॉल हेडर आले आहे. त्यानुसार या कॉल हेडरमध्ये कॉल एंड टुए एंड एन्क्रिप्टेड मेन्शन केलेले असणार आहे. यामुळे दोन व्यक्तींमधील बातचीतचा डेटा कोणीही व्हॉट्सअॅप डिकोट करण्यात येणार नाही आहे.