Lockdown मुळे लोकप्रिय ठरलेल्या Zoom App च्या युजर्सचा डेटा हॅक; पाच लाखाहून अधिक लोकांची माहिती गेली चोरीला
Zoom (Photo Credits: Play Store)

कोरोना विषाणूचे (Coronavirus) संकट आणि त्यानंतर सुरु झालेल्या लॉक डाऊन (Lockdown) दरम्यान, लोकप्रिय झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म झूमच्या (Zoom App) गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याबाबतचा एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये या App मधून वापरकर्त्यांची माहिती लीक झाल्याचे समजत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 500,000 हून अधिक झूम वापरकर्त्यांचे पासवर्ड आणि उर्वरित खात्याशी संबंधित तपशील एका अगदी कमी किंमतीमध्ये झार्क वेबवर विकले जात आहेत. डार्क वेबवरील माहिती ही क्रेडेंशिअल स्टफशी निगडीत आहे आणि वेगवेगळ्या सर्विसेसमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरकर्त्यांचा लीक केलेला डेटा वापरला गेला आहे.

1 एप्रिल रोजी एका सायबर सिक्युरिटी फर्मच्या हॅकर फोरममध्ये निदर्शनास आले की, झूम खात्याचा तपशील डार्क वेबवर विकला जात आहे. कंपनीला आढळले की 530,000 वापरकर्त्यांचा तपशील $ 0.002 (सुमारे 15 पैसे) मध्ये विकला जात आहे. एवढेच नव्हे तर अनेक खात्यांचा तपशील विनामूल्य शेअर केला जात आहे. वैयक्तिक माहितीच्या URL पासून ते ईमेल, पासवर्ड शेअर केले जात आहेत. Cyble नावाच्या सायबरसुरक्षा कंपनीने हा फोरम शोधला आणि BleepingComputer ने हा रिपोर्ट केला.  (हेही वाचा: Search On The Web: फेक मेसेजेस वर आळा बसवण्यासाठी WhatsApp ने सादर केले नवीन फिचर; आता फॉरवर्ड थेट गुगलवर तपासू शकणार)

तसेच या लीक केलेल्या तपशीलांमध्ये होस्ट-की देखील सामील आहे, ज्याच्या मदतीने कोणत्याही मिटिंगमध्ये सामील होऊन Zoombombing Attack केला जाऊ शकतो. याबाबत झूमचे प्रवक्ते म्हणाले, 'ही एक कॉमन वेब सर्व्हिस आहे ज्याच्या सहाय्याने ग्राहकांना लक्ष्य केले जात आहे.' मोठ्या संख्येने उर्वरित प्लॅटफॉर्मवरुन वापरकर्त्यांचा तपशील चोरीला गेला आहे आणि वापरकर्त्यांनी इतर कोणत्याही सेवेसाठी हे तपशील वापरले आहेत की नाही ते शोधून काढले जात आहे. अशात वापरकर्त्यांना त्यांचे झूम पासवर्ड त्वरित बदलण्याचा सल्ला दिला जात आहे.