Search On The Web: फेक मेसेजेस वर आळा बसवण्यासाठी WhatsApp ने सादर केले नवीन फिचर; आता फॉरवर्ड थेट गुगलवर तपासू शकणार
WhatsApp Logo (Photo Credits: Pexels)

कोरोना व्हायरस (Coronavirus) आजाराच्या पार्श्वभूमीवर, चुकीची माहिती, फेक न्यूज (Fake News) अशा गोष्टींचा सामना करणे सरकारसाठी एक डोकेदुखी बनले आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर (WhatsApp Group) प्रसारित होत असलेल्या या बनावट बातम्यांमुळे, अनागोंदी आणि घबराटीचे वातावरण निर्माण होते. यावर आळा बसवण्यासाठी भारत सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा जाहीर केला. मात्र तरीही या बनावट बातम्यांना पूर्णतः रोख लावणे शक्य झाले नाही. आता व्हॉट्सअॅपने याबाबत पुढाकार घेतला आहे. व्हॉट्सअ‍ॅने एक नवीन अपडेट आणले आजे, जे वापरकर्त्यास बातम्यांची सत्यता इंटरनेटद्वारे तपासणीसाठी मदत करेल.

व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवीन फीचर नुकतेच नव्या अपडेट्समध्ये जोडले गेले आहे. आता हे अपडेट चुकीच्या माहितीच्या प्रसाराचा प्रभावीपणे निपटारा करण्यासाठी जगातील सरकारांना मदत करेल. नवीन अपडेटची अधिकृत घोषणा WABetainfo ने केली आहे. WABetainfo नुसार, वेबवरील सर्च मेसेज व्हॉट्सअॅप वेब / डेस्कटॉपच्या नवीनतम आवृत्तीवर वापरला जाऊ शकतो. अँड्रॉइड आणि आयओएसवर हे फिचर अपडेट करण्यात आले आहे,

मेसेजच्या बाजूला असलेल्या सर्च आयकॉनवर टॅप करून वापरकर्ते व्हॉट्सअॅप मोबाइल अॅपवर फॉरवर्ड केलेला मजकूर पडताळून पाहू शकतात. जेव्हा आपण सर्च बारवर टॅप करता तेव्हा, तो आपल्याला Google वर आपला संदेश शोधू इच्छिता की नाही हे विचारेल. आपण 'होय' असे सिलेक्ट केल्यावर हे वैशिष्ट्य आपल्याला सर्च इंजिनवरील पेजवर घेऊन जाईल. याच ठिकाणी आपल्या तो मेसेज खरा आहे की नाही हे पडताळून पाहता येईल. (हेही वाचा: सरकारकडून तुमचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स वाचले जातायत? जाणून व्हायरल होणाऱ्या मेसेज मागील सत्य)

दरम्यान, सध्या देशात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, अशा वेळी सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. याच गोष्टीचा फायदा घेत अनेक लोक फेक मेसेज फॉरवर्ड करत आहेत, आता अशा गोष्टींवर काही प्रमाणात आळा बसू शकतो.