Fake Alert: सरकारकडून तुमचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स वाचले जातायत? जाणून व्हायरल होणाऱ्या मेसेज मागील सत्य
प्रातिनिधिक प्रतिमा (File Photo)

सोशल मीडियात मेसेजिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपचे करोडोच्या संख्ये युजर्स आहेत. मात्र सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यानुसार सरकार तुमचे व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅट्स वाचले जात असल्याचा दावा करण्यात आलेला मेसेज व्हायरल होत आहे. तसेच आपण एखाद्याला मेसेज पाठवल्यानंतर दिसणाऱ्या टीक्समधून तो वाचला जात असल्याचे ही म्हटले आहे. मेसेज मध्ये असा दावा केला आहे की, व्हॉट्सअॅपवरील मेसेजसाठी जर तीन ब्लू टीक्स दिसल्यास म्हणजे तो मेसेज सरकारकडून वाचला जात आहे. तसेच दोन ब्लू आणि एक लाल रंगाची टीक दिसल्यास सरकारने मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची दखल घेतली असून त्याला समन्स कोर्टाकडून पाठवण्यात आल्याचे मेसेज मध्ये सांगण्यात आले आहे.

मात्र व्हॉट्सअ‍ॅप युजर्सने सोशल सामाजिक घटना, राजकरण आणि सरकारच्या विरोधातील मेसेज पाठवण्यापूर्वी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तर व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेज सरकार वाचत असल्याच्या दावा करणाऱ्या मेसेज मागील सत्य काय आहे त्याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार सरकार तुमचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स वाचत नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारच नव्हे तर कोणत्याही थर्ड पार्टीकडून तुमचे चॅट्स किंवा फोन अॅक्सेस करण्याची परवानगी नाही आहे. ऐवढेच नाही तर कंपनी सुद्धा युजर्सचे व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅट्स वाचू शकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा ट्रॅक ठेवण्यासाठी भारत सरकारने लाँच केले ‘आरोग्य सेतू' App; आजूबाजूच्या परिसरातील Coronavirus पेशंट्सची मिळणार माहिती)

परंतु युजर्सने एखाद्याला पाठवलेला मेसेज समोरी व्यक्तीला पोहचल्यास आणि तेथे एकच टीक मार्क दिसते. त्यानंतर मेसेजसाठी दोन टीक मार्क दिसून आल्यास युजर्सच्या फोनवर तो मेसेज यशस्वीरित्या पाठवला असल्याचे दर्शवले जाते. तर दोन ब्लू टीक मार्क्स दिल्यास युजर्सने तुमचा मेसेज वाचल्याचे दाखवले जाते. तर व्हॉट्सअ‍ॅपच्या FAQ पेजने ही सुद्धी हिच माहिती युजर्सला दिली आहे.