Google Pay Now Available in Hinglish: गुगल पे चे भारतीयांना खास गिफ्ट; प्लॅटफॉर्मवर मिळणार Hinglish भाषेचा सपोर्ट, नवीन फीचरद्वारे यूजर्सं इंग्रजीमध्ये हिंदी वाचू शकतात
G Pay (Photo Credits-Twitter)

Google Pay Now Available in Hinglish: लोकप्रिय पेमेंट अॅप Google Pay ने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर हिंग्लिश (Hinglish) भाषेचा सपोर्ट जारी केला आहे. कंपनीने गेल्या वर्षी हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या या मिश्रणाची घोषणा केली होती, जी आता सर्व वापरकर्त्यांसाठी आणली जात आहे. नवीन फीचरद्वारे तुम्ही Google Pay वर इंग्रजीमध्ये हिंदी वाचू शकाल. वापरकर्ते सहजपणे अॅपला नवीन भाषेत स्विच करू शकतात.

या नवीन भाषेच्या समर्थनामुळे केवळ हिंदी वाचता येत नसलेल्या लोकांनाच फायदा होणार नाही, तर इंग्रजी व्याकरणात कमकुवत असलेल्या वापरकर्त्यांसाठीही हे सोपे होईल. उदाहरणार्थ, Scan Any QR Code करण्याऐवजी, koi bhi QR Code scan karen असे लिहिले जाईल. People च्या जागी Inse Tansaction kiya gya असे लिहिले जाईल. (हेही वाचा - WhatsApp Update: व्हॉट्सअॅप लवकरचं आणणार Edit Messages चा पर्याय; Typo Error चे देखील होणार निराकरण)

गुगल पे अॅपमध्ये Hinglish ला डिफॉल्ट भाषा कशी बनवायची ते जाणून घेऊयात -

  • सर्व प्रथम Google Pay अॅप उघडा.
  • शीर्षस्थानी असलेल्या तुमच्या प्रोफाइल चित्रावर टॅप करा.
  • त्यानंतर Settings वर जा.
  • सेटिंग्ज मेनूमध्ये, Personal Info वर टॅप करा.
  • त्यानंतर Language वर जा.
  • येथून तुम्ही तुमच्या आवडीची भाषा निवडू शकता.

हिंग्लिश व्यतिरिक्त 'या' भाषांनादेखील सपोर्ट -

  • हिंदी
  • बंगाली
  • गुजराती
  • कन्नड
  • मराठी
  • तमिळ
  • तेलुगु
  • हिंग्लिश

Android आणि iOS साठी Google Pay नऊ भारतीय भाषांना सपोर्ट देते. यात वरील भाषांचा समावेश आहे. गुगल पे च्या या नव्या फिचरचा सर्व-सामान्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच इंग्रजी न येणाऱ्यांसाठी हे फिचर अधिक उपयुक्त ठरणार आहे.